Home Cleaning Hacks Saam Tv
लाईफस्टाईल

Home Cleaning Hacks : घर साफ करण्याचा वैताग येतो? या 5 टिप्स फॉलो करा

How To Clean Home : खूप लोकांना घरची साफसफाई करायला कंटाळा येतो त्यामुळे मदत करण्यासाठी घरात मोलकरीण ठेवतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cleaning Home Hacks : खूप लोकांना घरची साफसफाई करायला कंटाळा येतो त्यामुळे मदत करण्यासाठी घरात मोलकरीण ठेवतात. पण मोलकरीण ठेवने सर्वांना शक्य नसते. घरातील कामे करण्याचा कंटाळा येतो, स्वतःला काम करायला आवडत नाही तेव्हा आणखीन अडचणी वाढतात.

दिवसभर बेडवर पडून घर (Home) कसे स्वच्छ (Clean) करायचे? याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पाच सोपे मार्ग सांगणार आहोत त्यामुळे तुमचे घर साफ करायचे टेन्शन सहज दूर होईल.

सकाळी उठल्याबरोबर बेड आवरून घ्या -

सकाळी तुम्ही उठल्याबरोबर लगेच बेड आवरून घ्या त्यामुळे नंतरच्या त्रासापासून स्वतःला वाचवण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही बेड व्यवस्थित केला तर बेडरूम आपोआप स्वच्छ दिसते.

घरात कमी सामान ठेवा -

घरात तुम्हाला गरज नसलेल्या वस्तू बाहेर काढा. कारण घरात जास्त सामान असल्याने साफसफाईचा ताण वाढतो. जर तुम्हाला हा तान दूर करायचा असेल तर कमी जागा लागेल आणि दोन पेक्षा जास्त कामासाठी वापरता येईल अशा वस्तू खरेदी करा. असे केल्याने तुम्हाला साफसफाईचे जास्त टेन्शन राहणार नाही आणि पैसेही वाचण्यास मदत होईल.

डोरमॅटचा वापर करा -

डोरमॅटचा वापर बाहेरील धुळीपासून बचाव करण्यासाठी होतो. डोअरमॅट महिन्यातून एकदा धुवावे लागते. घरात नेहमी तीन डोअर मॅट ठेवले पाहिजे. त्यामुळे तुमचे घर दीर्घकाळ स्वच्छ राहण्यास मदत मिळेल आणि लवकर घाण होणार नाही.

फ्रिज् लायनर वापरा -

फ्रिज् स्वच्छ करणे हे काही लोकांसाठी खूप त्रासदायक आहे आणि तुम्हालाही फ्रिज् साफ करण्याचा कंटाळा येत असेल तर अशावेळी फ्रिज् लाइनर मेट वापरा. ते स्वच्छ करणे खूप सोपे आहे तसेच वॉटरप्रूफ आणि ऑइल प्रूफ असल्यामुळे हे फायदेशीर आहे.

डस्ट मॉब चप्पल घाला -

जर तुम्हाला रोज झाडू न लावता घर स्वच्छ ठेवायचे असेल तर डस्ट मॉब चप्पल हा एक उत्तम उपाय आहे. याच्या मदतीने तुम्ही घरातील धूळ सहज बाहेर काढू शकता त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही आणि घरीही स्वच्छ होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT