Beetroot in Low BP Saam Tv
लाईफस्टाईल

Beetroot in Low BP : लो बीपीचा त्रास असणाऱ्यांनी चुकूनही करु नका बीटाचे सेवन, अन्यथा...

Low Blood Pressure : आवश्यक पोषकघटकांनी समृद्ध बीटरूट त्वचा, केस आणि वजनासाठी किती फायदेशीर आहे

कोमल दामुद्रे

Beetroot Side Effects : बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते त्यामुळे बीटरूटचा वापर औषध म्हणून केला. आवश्यक पोषकघटकांनी समृद्ध बीटरूट त्वचा, केस आणि वजनासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहिती आहे.

हिवाळ्यातील प्रमुख भाज्या मधील एक बीटरूट आहे.यात उपलब्ध असलेल्या पोषकघटकांनमुळे प्रत्येक ऋतू मध्ये बीटरूट चे सेवन करू शकता. याचे सौंदर्य व्यतिरिक्त इतर फायदेही मिळू शकतात.

त्यापैकी एक म्हणजे जर तुम्हाला लो बीपीचा (Blood Pressure) त्रास असेल तर तुम्ही सलाद मध्ये बीटरूट किंवा त्याचा रस पिऊ शकता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बीटरूट मर्यादित स्वरूपात खायला पाहिजे अन्यथा आरोग्यासाठी हानिकारक ठरेल जगभरातील अनेक अभ्यासकानी असे सुचित केले आहे की, कमी रक्तदाबाच्या समस्या असलेल्या लोकांवर बीटरूट नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

1. बीटरूट आरोग्यासाठी (Health) चांगले की वाईट

  • प्रथिने ,फायबर ,अँटीऑक्साइड आणि नायट्रेट्स इतर पोषकघटक बीडरूटमध्ये असतात. नायट्रेट्स शरीरातील रक्तदाब पातळी कमी करण्यासाठी ओळखले जाते.

  • याच कारणामुळे ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना बीटरूट खाण्याचा सल्ला देतात.

  • एका अहवालानुसार, नायट्रेट रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतात. अनेक तज्ज्ञांच्या असे म्हणणे आहे की एक ग्लास बीटरूटचा रस प्यायल्याने ब्लड प्रेशर लेवल झपाट्याने कमी करू शकतो.

  • त्यामुळे ज्या लोकांना लो ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन केल्यास थकवा, मळमळ, चक्कर येणे याचा त्रास होऊ शकतो.

Beetroot Side Effects

2. बीटरूचे सेवन किती प्रमाणात करावे

असे नाही की, बीटरूट खाण्याचे फक्त तोटेच आहेत जर तुम्ही बीटरूट चे सेवन मर्यादित प्रमाणात सेवन केले तर आरोग्याला फायदा होईल. तुमच्या हेल्दी डायट (Diet) मध्ये बीटरूटचे मर्यादित समावेश करा. विशेष तज्ञांच्या मते, एक दिवसात एक कप बीटरूट पेक्षा जास्ती सेवन करू नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Supari Recipe: डायजेशनसाठी उत्तम, चवीलाही जबरदस्त; घरगुती आवळा सुपारी कशी कराल?

ESIC Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी, ESIC मध्ये मोठी भरती, पगार १७०००० रुपये; वाचा सविस्तर

Mahesh Tilekar : "माणूस शून्य लोक..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'त्या' वागण्यानंतर महेश टिळेकर यांचे डोळे उघडले, सांगितला खास किस्सा

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, शहरातील वाहतुकीत मोठे बदल; या मार्गावरून करा प्रवास

SCROLL FOR NEXT