Baba Vanga Prediction saam tv
लाईफस्टाईल

Baba Vanga Prediction: 'या' वर्षी संपूर्ण जगाचा होणार सर्वनाश? बाबा वेंगांची भविष्यवाणी वाचून बसेल धक्का

Baba Vanga Prediction: बल्गेरियाच्या बाबा वांगा यांनी 1996 मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या भविष्यवाणी खऱ्या झाल्याचा दावाही करण्यात येतो. जर बाबा वेंगा यांचं भाकीत खरं ठरलं तर जगाचा नाश होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ही जगभरात चर्चेचा विषय ठरते. बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी राजकीय, जागतीक स्तरावर परिणाम पाहायला मिळतो. बल्गेरियाच्या बाबा वांगा यांनी 1996 मध्ये त्यांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या भविष्यवाणी खऱ्या झाल्याचा दावाही करण्यात येतो. सध्या त्यांची अशीच एक भविष्यवाणी चर्चेचा विषय ठरलीये.

बाबा वेंगा हे त्यांच्या अचूक अंदाजांसाठी ओळखले जातात. त्याने 2025 साठी भाकीत केलंय ज्याची जगभरात चर्चा होतेय. मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी जगाचा अंत, युद्ध आणि आपत्ती यासह अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. जर बाबा वेंगा यांचं भाकीत खरं ठरलं तर जगाचा नाश होऊ शकतो.

बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी ५०७९ पर्यंत भविष्यवाणी केली होती. सोव्हिएत युनियनचे विघटन आणि अमेरिकेतील अल कायदा या दहशतवादी संघटनेने 9/11 च्या हल्ल्या अशी अनेक बाबा वेंगाची भाकितं खरी ठरलीयेत. बल्गेरियातील अंध बाबा वेंगा यांची वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी दृष्टी गेली. 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं.

यावर्षी संपूर्ण जीवन येणार संपुष्टात

बाबा वेंगा यांनी 2043 मध्ये युरोपमध्ये मुस्लिम राजवट येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. बाबा वेंगाच्या अंदाजानुसार भूराजकीय बदलही होणार आहे. त्याचप्रमाणे 2130 मध्ये पृथ्वीबाहेरील प्राण्यांशी मानवी संपर्क होणार आहे. 3005 साली पृथ्वी आणि मंगळ यांच्यात युद्ध होण्याचे संकेत देण्यात आलेत. तर बाबा वेंगांच्या सांगण्यानुसार, 2025 मध्ये जगाचा विनाश सुरू होईल आणि 5079 मध्ये मानवतेचा अंत होऊ शकतो.

पृथ्वीवर राहणं होणार कठीण

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार 3797 पर्यंत पृथ्वीवर राहणं हे जवळपास अशक्य होणार आहे. यामुळे मानवाला पृथ्वीऐवजी इतर ग्रहांवर आश्रय घ्यावा लागणार आहे. शेवटी ५०७९ मध्ये पृथ्वीवरून सर्व काही नष्ट होईल म्हणजेच जीवन पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.

कोण होते बाबा वेंगा?

बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी वादळामुळे त्यांची दृष्टी गेली होती. त्यानंतर असं मानलं जातं की, त्यांना भविष्य पाहण्याची चमत्कारी शक्ती प्राप्त झाली होती. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांनी केलेले भाकित खरी ठरतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT