Navratri 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Navratri 2024 : अरेच्चा! यंदा नवरात्र ९ नाही तर १० दिवसांची; वाचा कधी आहे दुर्गाष्टमी

Navratrotsav 10 Says : यावर्षी नवरात्री १० दिवस चालणार आहे. यंदा १० दिवस का? याची माहिती या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

यंदाच्या नवरात्रोत्सवाला अवघे १० ते १२ दिवस शिल्लक राहिले आहेत. बाजारात अनेक मूर्तीकार देवीची सुबक मूर्ती घडवत आहेत. रेणुका माता, एकवीरा देवी अशा विविध रुपांत देवी घराघरामध्ये विराजमान होते. काही व्यक्तींच्या घरी देवीसाठी घटस्थापना केली जाते. नवरात्री म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव असतो. मात्र यंदाची नवरात्री ९ नाही तर १० दिवसांची आली आहे.

यंदा नवरात्रोत्सव १० दिवसांचा का?

यंदा २०२४ मध्ये आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने शारदीय नवरात्र १० दिवसांची असल्याचं पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी म्हटलं आहे. ३ ऑक्टोंबर रोजी घटस्थापना असून १२ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन आणि सरस्वती विसर्जन आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रीचा उत्सव तब्बल १० दिवस चालणार आहे.

३ ऑक्टोबरला घटस्थापना झाल्यावर ४ ऑक्टोबर चंद्रदर्शन त्यानंतर ६ ऑक्टोबरला विनायक चतुर्थी ७ ऑक्टोबरला ललिता पंचमी आहे. पुढे ८ तारखेला सेवादास महाराज यात्रा आष्टा आहे. ९ ऑक्टोबरला सरस्वती आवाहन आहे. तर १० तारखेला महाल्क्ष्मी पूजन आणि ११ ला दुर्गाष्टमी तसेच १२ ला दसरा आणि सरस्वती विसर्जन आहे.

पुढील १० वर्षे नवरात्री कोणत्या तारखेला येणार?

२०२५ मध्ये सोमवार २२ सप्टेंबर

२०२६ मध्ये रविवार ११ ऑक्टोबर

२०२७ मध्ये गुरुवार ३० सप्टेंबर

२०२८ मध्ये मंगळवार १९ सप्टेंबर

२०२९ मध्ये सोमवार ८ ऑक्टोबर

२०३० मध्ये शनिवार २८ सप्टेंबर

२०३१ मध्ये शुक्रवार १७ ऑक्टोबर

२०३२ मध्ये मंगळवार ५ ऑक्टोबर

२०३३ मध्ये शनिवार २४ सप्टेंबर

२०३४ मध्ये शनिवार १३ ऑक्टोबर

महराष्ट्रातील देवींची मंदिरे

राज्यात नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा केला जातो. भद्राकाली शक्तिपीठ, सप्तश्रृंगी मंदिर, मुंबा देवी मंदिर, यमई देवी मंदिर, तुळजा भवानी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काळू बाई मंदिर, आंबा देवी मंदिर, एकवीरा देवीचं मंदिर या मंदिरांना तुम्ही नवरात्रीत भेट देऊ शकता. येथे देवीच्या आगमनामुळे मोठी जत्रा भरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT