Manasvi Choudhary
नवरात्रोत्सवामध्ये अनेक जण ९ दिवस उपवास करतात.
उपवास करतानाही शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
नियमित पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. ज्यामुळे अशक्तपणा येत नाही.
उपवास सोडल्यानंतर लगेचच आंबट पदार्थ खाऊ नका. असे केल्याने अॅसिडिटीचा त्रास होईल.
उपवासानंतर शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी एक ग्लास पाणी, दही किंवा नारळ पाणी प्या.
उपवास सोडल्यानंतर बऱ्याचदा अनेक जण चहा-कॉफी पितात. मात्र, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने आरोग्यावर परिणाम होतो.
.
काफी-चहा पिण्याऐवजी तुम्ही ताज्या फळांचा रस, ताक किंवा थंड दूध प्या