Couple Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Couple Relationship Tips : एकत्रित कुटुंबात राहून तुमचं प्रेम फुलवायचं आहे ? मग या गोष्टींची काळजी घ्या

Joint Family Couple issue : एकत्रित कुटुंब असलं की, त्यांना एकमेकांना हवा तसा वेळ देता येत नाही. त्यामुळे बरेचदा त्याच्यात खटके देखील उडतात.

कोमल दामुद्रे

Relationship Tips For Couple : लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला आपल्या नात्यासाठी वेळ हवा असतो. आपलं नातं अधिक घट्ट व्हावं असं त्यांना प्रकर्षाने जाणवतं. परंतु, एकत्रित कुटुंब असलं की, त्यांना एकमेकांना हवा तसा वेळ देता येत नाही. त्यामुळे बरेचदा त्याच्यात खटके देखील उडतात.

आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स (Tips) देत आहोत ज्यामुळे तुम्हाला एकत्र कुटुंबात राहूनही एकत्र राहायला आणि बोलायला वेळ मिळेल. तिथे एकत्र राहूनही तुम्ही रोमान्स करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना आधार देणं. जोपर्यंत तुम्ही एकमेकांना साथ देत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही.

1. बाहेर फिरायला जा

तुम्हाला तुमच्या जीवनसाथीसोबत बाहेर कुठे तरी फिरायला जावं लागेल जेव्हा कधी तुम्ही कुठेतरी फिरायला जाता. तेव्हा तुम्हाला हवा तसा वेळही देता येईल. ज्यामुळे तुमचं नातं (Relationship) अधिक घट्ट होईल.

2. हॉटेल रूम

हॉटेल रूम बुक करून तुम्ही काही वेळ एकत्र घालवू शकता तुम्ही एक-दोन दिवस हॉटेलमध्येही राहू शकता. जिथे तुम्ही दोघेही आरामात बोलू शकता, मजा करू शकता, एकमेकांना जाणून घेऊ शकता. सुख-दु:ख वाटून घेण्यासाठी हॉटेल्सही तुमच्यासाठी उत्तम ठिकाण असू शकतात.

3. इतर जोडप्यांशी स्वत:ची तुलना नको

इतर जोडप्यांशी कधीही स्वतःची तुलना करू नका. प्रत्येकाचे स्वतःचे आयुष्य असते. त्यात अनेक समस्या येतात. त्यांना बघून तुम्हाला हेवा वाटण्याची शक्यता आहे, पण त्यांची अवस्थाही तुमच्यासारखीच असण्याची शक्यता आहे. म्हणूनच इतरांना मज्जा करताना पाहून कधीही दुःखी होऊ नका. आपल्या नात्याचे सौंदर्य ओळखा, त्याचावर प्रेम करा, त्याचा आदर करा. तुम्हाला तुमच्या नात्याला थोडा वेळ द्यावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NAFSCOB च्या संचालकपदी ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर बिनविरोध

Maharashtra News Live Update: भीमाशंकर वृक्षतोड प्रकरणावर वनमंत्री गणेश नाईक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रकरणाची तपासणी सुरू

Ladki Bahin Yojana : अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! खात्यात ₹1500 जमा होण्यास सुरुवात; लगेच करा चेक

उजनी धरणावर उभारणार 2 हजार मेगावॅटचा सोलार प्रकल्प; ४० हजार रोजगारांची संधी

शिंदेसेनेसोबतच्या वादानंतर भाजपचा मोठा निर्णय; 'स्थानिक' निवडणुका स्वबळावर, महिला नेत्याचा कार्यकर्त्यांना संदेश

SCROLL FOR NEXT