Google Saam Tv
लाईफस्टाईल

Never ever search on Google: सावधान! गुगलवर चुकूनही असे शब्द सर्च करू नका, अन्यथा ठरलेली आहे तुरुंगवारी

Vishal Gangurde

Never ever search on Google:

जगभरातील जवळपास लोकापर्यंत इंटरनेटचं जाळं पोहोचलं आहे. अभ्यासातील अवघड प्रश्न किंवा मनोरंजन अशा सर्व गोष्टींसाठी इंटरनेटचा आधार घेतला जातो. मात्र, गुगलवर काही शब्द सर्च करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. इंटरनेटवर काही चुकीचे शब्द सर्च केल्याने तुरुंगवारीही भोगावी लागू शकते. (Latest Marathi News)

बेकायदेशीर कामे सर्च करू नये

गुगलवर सर्वच बाबींची माहिती एका क्लिकवर मिळते. मात्र, बेकायदेशीर मजकूर शोधल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यातही सापडू शकता.

बेकायदेशीर मजकूर सर्च केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. उदाहरण सांगायचं झालं तर गुगलवर बॉम्ब बनविणे आणि घरात बंदूक तयार करणे असं सर्च करणं महागात पडू शकतं.

चाइल्ड पोर्नोग्राफी

भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कठोर कायदे आहेत. तुम्ही चुकूनही याबाबत मजकूर सर्च केल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. पोर्नोग्राफीच्या वेबसाइटवर काही मालवेयर असतात. या मालवेयरमुळे तुमचा लॅपटॉप, कॉम्पुटर किंवा मोबाईलमधील अकाउंट हॅक होऊ शकतं. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गर्भलिंग तपासण्याबाबत सर्च करणे

भारतात गर्भलिंग तपासणी करणे कायद्याने गुन्हा आहे. याच कारणासाठी तुम्ही गुगलवर सर्च करत असाल तर यासाठी तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.

कस्टमर केयर सर्च करणे टाळा

आजकाल बहुतांश कंपन्या ग्राहक सेवेच्या सुविधा देतात. अनेकदा युजर ग्राहक सेवेसाठी इंटरनेटवर संबंधित नंबर सर्च करतात. मात्र, याचा गैरफायदा काही जण घेतात.

काही जण इंटरनेटवर seo च्या मदतीने बनावट वेबसाईट तयार करतात. या वेबसाईटवर बनावट नंबर उपलब्ध असतात. या नंबरवर कॉल केल्यानंतर ग्राहकाची फसवणूक करण्यात येते. त्यामुळे इंटरनेटवर कस्टमर केयरचा नंबर सर्च करणे टाळले पाहिजे.

औषधाबद्दल सर्च करणे

काही युजर इंटरनेटवर आजारावर उपचार करण्यासाठी औषधे सर्च करतात. काही युजर आजारपणात औषधांचं नाव सर्च करत असतात. त्यानंतर मिळालेल्या माहितीवर औषधे घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आजारावर अशा प्रकारची औषधे सर्च केल्याने तुरुंगवारी होणार नाही, मात्र या चुकीमुळे रुग्णालयात जायची वेळ येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT