Blood pressure food, which rice is best for blood pressure patients ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी हा भात ठरेल फायदेशीर !

रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी आहारात कोणत्या भाताचा समावेश करावा हे जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अनेकदा भात खाण्याची इच्छा असूनही आपल्याला तो खाता येत नाही. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत आपण अनेक आजारांनी ग्रस्त आहोत त्यापैकी एक रक्तदाब.

हे देखील पहा-

आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला रक्तदाब नियंत्रणात ठेवता येत नाही. त्यामुळे वाढणारा रक्तदाब व कमी होणारा रक्तदाब यामुळे आपले आरोग्य सतत बिघडत असते. उच्च रक्तदाबात आपल्याला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. परंतु, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी या बरोबर ठेवल्यास आपण या आजारांपासून लांब राहू शकतो. बऱ्याच लोकांना भात खाण्याची सवय असते पण रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना भात खाण्यास मनाई केली जाते. त्यासाठी कोणता भात फायदेशीर असेल हे जाणून घेऊया.

- रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात ब्राउन राईसचा समावेश करायला हवा. यामध्ये भरपूर प्रमाणात खनिज, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळते. त्यामुळे शरीरात असणारे विषारी पदार्थ काढण्यास मदत करते त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो व हृदय देखील निरोगी राहते. पांढऱ्या तांदळापासून बनवलेला भात खाल्ल्याने शरीरातील ग्लूकोज वाढते व आपला रक्तदाब वाढू लागतो. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी याचे सेवन करु नये.

ब्राउन राईस व पांढऱ्या तांदळातील अंतर -

तांदळामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रथिने आढळून येतात. तृणधान्यांती सर्व पोषक घटक ब्राउन राईसमध्ये (Rice) आढळून येतात. यात तंतुमय असणाऱ्या कोंड्यामुळे शरीराला पोषण तत्व मिळते. पांढऱ्या भातामध्ये कोंडा व त्यातील इतर घटक काढल्यामुळे त्याचा आपल्या शरीराला योग्य तो फायदा (Benefits) होत नाही.

ब्राउन राईस खाण्याचे फायदे -

१. ब्राउन राईसमध्ये मॅग्नेशियम आणि फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो.

२. या संबंधीत असणाऱ्या अनेक हृदयाच्या समस्येवर मात करता येते.

३. ब्राऊन राइसमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते.

४. वजन कमी करण्यासाठी ब्राउन राईसचा आपल्या आहारात समावेश केल्यास फायदेशीर ठरेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT