Mysterious story saam tv
लाईफस्टाईल

Mysterious story: ही आहे जगातील सर्वात रहस्यमयी गुहा; इथे ३ वेळा टाळ्या वाजवल्यानंतर घडतं असं की...!

Mysterious story: जगभरात अशा गोष्टी आहेत ज्यांच्या रहस्यांचा उलगडाही झालेला नाही. आज आम्ही अशाच एका रहस्यमयी गुहेबद्दल सांगणार आहोत.

Surabhi Jagdish

जगभरात अनेक रहस्य आहेत. यामधील काही रहस्य अशी आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. मात्र काही रहस्य अशी आहेत, ज्यांच्याबद्दल कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. दरम्यान काही रहस्यांचा उलगडाही झालेला नाही. यामध्ये वैज्ञानिकांनाही या रहस्याचा शोध लागलेला नाही. आज आम्ही अशाच एका रहस्यमयी गुहेबद्दल सांगणार आहोत.

रहस्यमयी गुहेबद्दल तुम्ही ऐकलंय का?

आज आम्ही तुम्हाला ज्या गुहेबद्दल माहिती देणार आहोत, त्यामध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत. याचं कारण म्हणजे, जो कोणी व्यक्ती या गुहेत गेल्यानंतर जर तीन वेळा टाळ्या वाजवल्या तर आपोआप पाणी गळू लागतं. दरम्यान हे कशामुळे होतं, यामागील रहस्याचा शोध अजून तज्ज्ञ लावू शकलेले नाहीत.

कुठे आहे ही रहस्यमयी गुहा?

कदातिच हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हे खरं आहे. ही गुफा आपल्या भारतातच आहे. झारखंडमधील रायगडमध्ये ही गुहा असल्याची माहिती आहे. या गुहेच्या आत जाऊन कोणी तीन वेळा टाळी वाजवली की, गुहेच्या छतामधून पाणी येत असल्याचं समोर आलं आहे.

गुहा बनली कुतुहलाचा विषय

ही गुहा नेहमीच लोकांच्या कुतुहलाचा विषय असते. अनेक पर्यटक देखील ही गुहा पाहण्यासाठी गर्दी करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, टाळी वाजवल्यानंतर त्यांचा आवाज गुहेच्या छताला जाऊन आदळतो आणि त्यानंतर कंपनं निर्माण होतात. अशावेळी छतावर असलेलं पाणी हळूहळू वाहू लागतं. दरम्यान या पाण्याचा उगम कुठे आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही.

ही रहस्यमयी गुहा फार प्रचलित असल्याने अनेक जण या ठिकाणी येऊन भेट देतात. त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यांनुसार, याला पर्यटनाचा दर्जा देण्यात यावा. जेणेकरून इथला विकास देखील होईस आणि लोकांना रोजगार मिळेल.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT