Most Expensive Sandwich Saam Tv
लाईफस्टाईल

Most Expensive Sandwich : अबब ! हे आहे जगातील सगळ्यात महागडं सॅण्डविच! किंमत वाचाल तर खायचं विसरून जाल!

Viral News : सॅण्डविच हा खरंतर आपला नेहमीच्याच खाण्यातला प्रकार. त्यामुळे अनेकदा त्याला चवीने खाल्ले जाते.

कोमल दामुद्रे

Sandwich Recipe : असंख्य खादाड प्रेमीचा आवडता पदार्थ जर कोणता असेल तर तो सॅण्डविच. सहज पण पटकन बनवला जाणारा पदार्थ. सॅण्डविच हा खरंतर आपला नेहमीच्याच खाण्यातला प्रकार. त्यामुळे अनेकदा त्याला चवीने खाल्ले जाते.

सॅण्डविच हा कधीही खाल्ला जाणारा पदार्थ आहे. सॅण्डविच आरोग्यालाही (Health) हानीकारक ठरत नाही. अगदी स्ट्रीट फूडपासून ते नाश्त्यापर्यंत आपण सॅण्डविच हमखास खाल्ले जाते. पण या बाबतीत अमेरिका (America) आपल्या पुढे आहे. त्यांनी जागतिक पिझ्झा दिवस इत्यादी खाद्यपदार्थांवर अनेक खास दिवस बनवले आहेत.

यापैकी एक पदार्थ म्हणजे ग्रील्ड चीज सॅण्डविच, जे अमेरिकन लोकांना आवडते. ग्रील्ड चीज सँडविच खूप लोकप्रिय आहेत कारण ते बनवायला सोपे नाहीत तर चवीलाही छान आहेत. बनवायला फक्त काही मिनिटे लागतात. याशिवाय सॅण्डविच हे स्वस्त खाद्यपदार्थ देखील आहे, जे सर्वत्र सहज उपलब्ध आहे.

1. जगातील सर्वात महाग सॅण्डविच

सेरेंडिपिटी 3, न्यूयॉर्कमधील लोकप्रिय रेस्टॉरंटने त्यांचे 'क्विंटेसेंशियल ग्रील्ड चीज सँडविच' पुन्हा लाँच केले आहे. पण त्याच्या किमतीने सगळ्यांचीच झोप उडाल्याची बातमी आहे. या रेस्टॉरंटमध्ये या सॅण्डविचची किंमत (Price) $214 आहे, जी 17,500 रुपये आहे. 'नॅशनल ग्रील्ड चीज डे'च्या निमित्ताने रेस्टॉरंटने ही ऑफर दिली होती.

2. फक्त या विशेष दिवशी उपलब्ध

रेस्टॉरंटने इंस्टाग्रामवर सॅण्डविचची रीलाँच घोषणा शेअर केली आणि म्हणाले, "आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जिंकणारी डिश परत आणत आहोत. 'नॅशनल ग्रील्ड चीज डे'ला न्यूयॉर्कमध्ये खास ग्रील्ड सॅण्डविच उपलब्ध असेल." या सँडविचची किंमत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहे. $214 वर, हे जगातील सर्वात महाग सँडविच आहे.

3. या सॅण्डविचमध्ये काय खास आहे?

या सॅण्डविचमध्ये वापरलेले 'चीज' ही त्याची खासियत आहे. यात 'कॅसिओकाव्हॅलो पोडोलिको चीज' वापरण्यात आली आहे, जी खास गायीच्या दुधापासून तयार केली जाते. याशिवाय हे सॅण्डविच 23 कॅरेट सोन्यात टोस्ट केले आहे, ज्यामुळे ते आणखी खास बनते.

हे सॅण्डविच उच्च-गुणवत्तेच्या बॅकरॅट क्रिस्टल प्लेटवर दिले जाते. ही प्लेट दक्षिण आफ्रिकन लॉबस्टरपासून बनवलेल्या टोमॅटो सॉससह दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Vima Sakhi : LIC ची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००, अट फक्त १०वी पास

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Weather Forecast: आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट, महाराष्ट्रात काय स्थिती?

आज निर्णय घेतलात तर बदलू शकतं भविष्य! १७ डिसेंबरचं पंचांग काय सांगतं?

Daily Walking: दररोज फक्त इतकंच चाला, राहाल फिट अँड फाइन; ढिगभर फायदे आणि आयुष्यही वाढेल

SCROLL FOR NEXT