skin care tips, skin care problem, Best Skincare Tips in Marathi, Natural Skin Care Tips
skin care tips, skin care problem, Best Skincare Tips in Marathi, Natural Skin Care Tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरेल ही औषधी वनस्पती !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सौंदर्य हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अंग आहे. त्याची काळजी घेण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. प्रदूषण व कामाच्या ताणाचा परिणाम त्वचेवर होत असतो. (Best Skincare Tips in Marathi)

हे देखील पहा -

चेहऱ्यासाठी (Skin) आयुर्वेदातली महत्त्वपूर्ण वनस्पती ही ब्राम्ही आहे. सहसा आपण त्याचा वापर केसांसाठी (Hair) करतो. पण त्याचा उपयोग आपल्याला त्वचेसाठी देखील आहे. ब्राम्हीत अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. त्यामुळे आपली त्वचा दीर्घकाळ तरूण राहण्यास मदत होते. सध्या बाजारात ब्राम्हीचे तेल, पावडर, पेस्ट, कॅप्सूल आणि सरबत सहज मिळते. त्याचा चेहऱ्यासाठी उपयोग कसा होतो ते पाहूया

ब्राम्हीचा वापर चेहऱ्यासाठी असा होतो-

१. वयानुसार आपल्या शरीरात बदल होत असतात ज्यामुळे चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या दिसू लागतात.अशावेळी आपण ब्राह्मीचे सेवन करावे. यासाठी ब्राह्मीची पाने पाण्यात उकळून प्या. यामुळे आपली त्वचा तरूण होण्यास मदत होईल.

२. त्वचेचे विविध आजार बरे करण्यासाठी ब्राम्ही खूप उपयुक्त ठरते. त्वचेला खाज सुटत असल्यास त्वचेशी संबंधित समस्या असतील तर अशावेळी ब्राम्हीचा वापर करा. ब्राम्हीच्या पानांची बारीक करुन पेस्ट बनवा व दुधात मिसळवून लावा. असे केल्याने त्वचेवरील खाज थांबेल.

३. आपली त्वचा खूप कोरडी असेल किंवा सतत फुटत असेल तर ब्राम्ही फायदेशीर ठरू शकते. ती आपल्या त्वचेला पोषण देते व त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करते. ब्राह्मी पावडर व तुप घालून मिक्स करा. हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावाल्यास फायदा होईल.

४. मुरुमांची समस्या असल्यास व त्याचे मुरुमांचे डाग हलके करण्यासाठी आणि ब्राह्मी उपयुक्त आहे. यासाठी ब्राह्मीची पाने पाण्यात उकळून प्या. याशिवाय आपण त्याची पेस्टही त्वचेवर लावू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Voting: मतदान केंद्रापासून 100 मीटरवर असताना जागीच कोसळले! मतदानासाठी जात असतानाच काळाचा घाला

Kolhapur: हिरण्यकेशी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Arvind Kejriwal News: १०० चे १००० कोटी कसे झाले? अरविंद केजरीवाल यांच्या कारवाईवरुन सुप्रीम कोर्टाचा ईडीला सवाल; सुनावणीत काय घडलं?

Live Breaking News : अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Rajendra Gavit News | शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश,फडणवीसांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT