Common sleep pattern dangerous saam tv
लाईफस्टाईल

Common sleep pattern dangerous : झोपेदरम्यान हा कॉमन पॅटर्न ठरू शकतो जीवघेणा; संशोधनातून धक्कादायक बाब उघड

Sudden death during sleep: झोपताना काही लोकांना एक सामान्य सवय किंवा स्थिती असते, जी अत्यंत धोकादायक ठरू शकते आणि संशोधनानुसार ती जीवघेणी देखील ठरू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

पोटभर जेवलं की छान एक झोप काढण्याचं तुमचं मन होतं का? दुपारी जेवणानंतर झोपायची सवय तुम्हालाही आहे का? किंवा ऑफिसमधल्या थकव्यानंतर तुमच्याही डोळ्यावर झोप असते का? जर यांचं उत्तर होय असेल तर आता तुम्ही आता सावध होण्याची वेळ आलीये. याचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय संशोधनात दावा करण्यात आला आहे की, दिवसा वारंवार किंवा जास्त झोप येत असेल तर ही ही सवय अकाली मृत्यूचा धोका तब्बल २०% ने वाढवते.

Sleep 2025 Conference मध्ये सादर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आलीये. या संशोधनात ८६,००० हून अधिक मध्यम वयाच्या व्यक्तींच्या झोपेच्या सवयी अनेक वर्षं ट्रॅक करण्यात आल्या. त्यामध्ये असं आढळून आलं की, ज्या व्यक्ती नियमितपणे दिवसा विशेषतः दुपारी झोपत होत्या त्यांच्यात वेळेपूर्वी मृत्यू होण्याचा धोका बऱ्यापैकी जास्त होता.

अभ्यास काय सांगतो?

या अभ्यासामध्ये सहभागी लोकांची झोप ‘अ‍ॅक्टिग्राफी’ नावाच्या डिव्हाइसने एक आठवड्यापर्यंत नोंदवण्यात आली. या अभ्यासातून असं दिसून आले की, दुपारी ११ ते १ दरम्यान झोप घेणाऱ्यांमध्ये ७% अधिक मृत्यू धोका होता. तर ज्या व्यक्ती अधिक वेळ आणि अनियमित झोप घेत होत्या त्यांच्यात हा धोका तब्बल २०% पर्यंत वाढलेला दिसून आला.

संशोधनाच्या लीड रिसर्चर प्रोफेसप चेनलू गाओ यांनी सांगितलं की, ही फक्त झोपण्याची सवय नसून आपण किती वेळ, कितीदा आणि कोणत्या वेळेस झोपतो, यावर आपल्या आरोग्याचं भवितव्य ठरतं. अनियमित झोप घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकार, टाइप २ मधुमेह, नैराश्य आणि डिमेंशिया यांसारख्या गंभीर आजारांची शक्यता अधिक दिसून आली.

डॉक्टरांचं म्हणणं काय?

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यांनुसार, जर दिवसा वारंवार झोप येत असेल, तर ती केवळ थकवा नसून शरीरातील एखाद्या गंभीर समस्येचा एक इशारा असू शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी आता रात्रीच्या झोपेबरोबरच दिवसा घेतलेल्या झोपेचाही तपशील विचारावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Ladki Bahin Yojana Scam : लाडक्या बहिणींचे पैसे लाटले, आता १४ हजार पुरुषांवर होणार कारवाई; सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT