Hair care tips, Hair care tips for men, Hair falls problem ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पुरुषांच्या केसांसाठीही ठरेल हे आयुर्वेदिक फळ फायदेशीर !

आयुर्वेदातील कोणते फळे केसांसाठी फायदेशीर ठरेल.

कोमल दामुद्रे

मुंबई : आयुर्वेदात असे काही पदार्थ आहे जे आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळतात. आयुर्वेदात बऱ्याच औषधी वनस्पती आहे त्यातील एक रीठा.

हे देखील पहा -

आयुर्वेदिक गुणांमध्ये रीठा हे केसांसाठी अधिक फायदेशीर मानले जाते. चांगल्या केसांसाठी स्त्रिया (Womens) नेहमी आपल्या केसांना रीठाचा वापर करतात. रीठामध्ये लोहाचे प्रमाण अधिक प्रमाणात असते जे आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे. रीठात असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. परंतु याचा फायदा फक्त महिला वर्गांना होत नाही तर पुरुषांना देखील होऊ शकतो. बहुतेक पुरुष आपले केस सुंदर दिसण्यासाठी काही महागड्या केसांच्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र यात असणारे रसायन केसांचे आरोग्य बिघडवण्याचेही काम करतात. त्याचबरोबर केसांची निगा राखण्यासाठी रीठाचा वापर केसांना नैसर्गिकरीत्या सुंदर बनवू शकतात. पुरुषांच्या केसांमध्ये रीठा लावण्याचे फायदे जाणून घेऊया.

१. केस गळती थांबवण्यासाठी रीठा अधिक फायदेशीर ठरु शकते. रीठा, शिकाकाई, लिंबाची साले व आवळा पावडर मिसळून केसांना लावल्यास केस गळतीची समस्या कमी होईल. तसेच केस वाढण्यास मदतही होईल.

२. केसांचा (Hair) कोरडेपणा आणि कोंडा दूर करण्यासाठी रीठाचा वापर खूप प्रभावी आहे. यासाठी केसांना रीठा लावा आणि थोड्या वेळाने केस कोमट पाण्याने धुवा. रीठा नियमितपणे केसांवर लावल्याने कोंडा कमी होण्यास सुरुवात होईल.

३. रीठामध्ये आयुर्वेद गुणधर्मांसह अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल घटक आढळतात. केसांवर रीठाचा वापर करून आपण टाळूच्या संसर्गापासून दूर राहू शकतो. यासोबतच केसांमधील उवा आणि केसांमध्ये असणाऱ्या चिकटपणापासून मुक्त होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death : २५ वर्षीय CA ने आयुष्य संपवलं, फुगे फुगवण्याच्या गॅसची नळी तोंडात घातली अन्... तरुणाची अवस्था पाहून पोलिसही हडबडले

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

SCROLL FOR NEXT