Heart Failure
Heart Failure Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Failure: 'या' महिलांना हार्ट फेल्युअरची जास्त शक्यता; जाणून घ्या धोका कमी कसा करावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हृदयाशी संबंधित समस्या जगात तसेच भारतातही सामान्य आहेत. अनेक कारणांमुळे सध्या हृदयाशी संबंधित आजारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लहान वयातच स्त्री-पुरुषांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होत आहेत. त्या टाळण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपायही करून बघतात. नुकताच एक अभ्यास झाला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की ज्या महिलांना मुले होऊ शकत नाहीत त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल (MGH) मधील संशोधकांनी हा अभ्यास केला. तर, अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित केला आहे.

अभ्यासात काय सांगितले आहे?

मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या महिला वंध्यत्व किंवा मूल जन्माला घालण्यास असमर्थ आहेत (Infertility) त्यांना हार्ट फेल्युअरचा धोका 16 टक्के जास्त असतो. मॅसॅच्युसेट्सच्या जनरल हॉस्पिटलमधील रजोनिवृत्ती, हार्मोन आणि कार्डिओव्हस्कुलर क्लिनिकच्या संचालक एमिली लाऊ म्हणाल्या आहेत की, आम्ही हे अभ्यासले आहे की, स्त्रीमध्ये मूल न होण्याची समस्या तिला भविष्यातील हृदयविकाराचा संभवतो. तर दुसरीकडे, जर एखाद्या महिलेला गर्भधारणा होण्यास त्रास होत असेल किंवा रजोनिवृत्तीच्या (Menopause) काळात समस्या उद्भवल्या असतील तर अशा महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढतो.

हे देखील पाहा-

दोन प्रकारे होतो हार्ट फेल्युअर;

या अभ्यासात सांगण्यात आले आहे की, हार्ट फेल्युअरचे 2 प्रकार आहेत. Preserve ejection fraction (HFpEF) ते हार्ट फेल्युअर आणि Reduced ejection fraction (HFrEF) हार्ट फेल्युअर. Preserve ejection fraction मध्ये हृदयाचे स्नायू आपले काम योग्यरित्या काम करणे थांबवतात आणि Reduced ejection fraction मध्ये हृदयाचे डावे वेंट्रिकल (Chamber Of Heart) योग्यरित्या रक्त पंप करण्यास सक्षम नसते.

या टीमला वंध्यत्व आणि एकूणच हार्ट फेल्युअर यांच्यातील एक दुवा आढळला. रिझर्व्ह इजेक्शन फ्रॅक्शन हा बहुतांश महिलांमध्ये हार्ट फेल्युअरचा मुख्य प्रकार असल्याचे या अभ्यासात सांगण्यात आले. या संशोधनात 38,528 पोस्टमेनोपॉझल महिलांचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी 14 टक्के महिलांनी सांगितले की त्यांना वंध्यत्वाची समस्या आहे.

15 वर्षांच्या संपूर्ण अभ्यासानंतर, संशोधकांनी नोंदवले आहे की वंध्यत्वाच्या समस्येमुळे हार्ट फेल्युअरचा धोका 16 टक्क्यांनी वाढतो. जेव्हा त्यांनी हार्ट फेलच्या कारणांची तपासणी केली तेव्हा त्यांना आढळले की वंध्यत्व असलेल्या महिलांमध्ये Preserve ejection fraction हार्ट फेल्युअरचा धोका 27 टक्क्यांनी वाढला आहे.

तसेच, एमिली लाऊ पुढे म्हणाल्या वंध्यत्व 20-40 वर्षांच्या दरम्यान दिसून येते. जर एखाद्या महिलेला आधीच वंध्यत्वाची समस्या असेल तर आपण ती बदलू शकत नाही, परंतु जर स्त्रीला वंध्यत्वाची समस्या असेल तर तिला हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काही पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये सांगण्यात आलय की, उच्च रक्तदाब कमी करणे, उच्च कोलेस्ट्रॉल कमी करणे, धूम्रपान सोडणे इ. उपाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

Sambhajinagar News: प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची ‎कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी, मायलेकांना जन्मठेप

Special Report : नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना

Pune News | पुण्यातील चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT