Girl Drinking Water
Girl Drinking Water Saam Tv
लाईफस्टाईल

Normal Water Or Warm Water : 'या' लोकांनी चुकनही गरम पाण्याचे सेवन करु नका; आयुर्वेदिक डॉक्टारांनी सांगितली महत्त्वाची कारणे

कोमल दामुद्रे

Benefits of Warm Water : पाणी हे आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचे पेयं आहे. पाणी हेच जीवन आहे असं म्हणायला हरकत नाही. पाण्याशिवाय आपण एक दिवस सुद्धा जगू शकत नाही. अशातच जगामधील सर्व लोकं पाणी पितात.

कोणी कमी प्रमाणात पाणी पीतं तर कोणी योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करत. त्याचबरोबर प्रत्येक जण आपलापल्या हिशोबाने पाणी पिण्याची निवड करतात. कोणाला थंड पाणी पियायला आवडते तर कोणाला गरम किंवा कोमट. परंतु तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का की , आपल्यासाठी कोणते पाणी पिणे बरोबर आहे. नसेल तर जाणून घ्या.

आयुर्वेदानुसार (Ayurved) कोणतीच गोष्ट किंवा नियम (Rules) हे स्वास्थ्यवर्धक नसतात. त्यामुळेच काही लोकांसाठी कोमट पाणी (Water) आरोग्यास (Health) जास्त चांगले असते. तर काही लोकांसाठी नॉर्मल पाणी पिणे चांगले असते. आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर रेखा यांनी अष्टांगहृदय सूत्रस्थान चा अहवाल देत ही गोष्ट सांगितली की, व्यक्तीला कोणत्या पद्धतीचे पाणी प्यायला हवे.

त्यांच्या मते, पाण्याला जीवन, तृप्त करणारा, आनंद देणारा आणि अमृतासारखे मानले जाते. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सांगण्यानुसार काही लोक अनेक समस्यांमधून जातं आहेत. त्या लोकांनी फक्त नॉर्मलच पाण्याचे सेवन केले पाहिजे. त्यांनी गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने त्यांच्या समस्या वाढू लागतील.

1. दारू पिल्यावर गरम पाणी पिणे हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरते.

2. थकवा किंवा चक्कर आल्यावर गरम पाण्याचे सेवन करू नये.

3. तुम्हाला जेव्हा जास्त प्रमाणात तहान लागते. तेव्हा तुम्ही थंड पाणी प्यावे आणि गरम पाण्याचे सेवन टाळावे.

4. जेव्हा तुम्ही उन्हामध्ये असता तेव्हा गरम पाण्याचे सेवन करू नये. अशावेळी तुम्ही नॉर्मल पाणी प्यावे.

5. त्याचबरोबर ब्लीडिंग डिसऑर्डरपासून ग्रस्त असलेल्या लोकांनी गरम पाण्याचे सेवन करू नये.

6. ज्या लोकांना फूड पॉइजनिंग झाले असेल त्यांनी गरम पाण्याचे सेवन किंवा कोमट पाणी पिऊ नये.

Water

डॉक्टरांनी असही पटवून सांगितलं की नॉर्मल पाण्याला उकळवून आणि नंतर ते थंड करून प्यायले तर त्या पाण्याला नॉर्मल पाणी आपण म्हणू शकतो.

या लोकांनी प्यायले पाहिजे कोमट पाणी :

1. ज्यांना कमी प्रमाणात भूक लागते. त्यांनी कोमट पाणी प्यावे.

2. लो डायजेस्टिव्ह फायर झाल्यावर कोमट पाण्याचे सेवन करावे.

3. तुमचा घसा दुखत किंवा सुजला असेल तेव्हा तुम्ही कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे.

4. तुम्हाला ताप, सर्दी,खोकला यांसारख्या जर झाले असतील तर तुम्ही कोमट पाण्याचे सेवन केले पाहिजे.

5. तुमचे शरीर जेव्हा दुखत असेल तेव्हा तुम्ही कोमट पाणी प्या.

6. जेव्हा तुमचं पोट फुगतं त्यावेळेस तुम्ही कोमट पाण्याचे सेवन करा.

पाणी पिताना तुम्ही जास्त गरम पाणी पिऊ नये आणि जास्त थंड पाण्याचे सेवन देखील करू नये. ते तुमच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्याचबरोबर पाणी पिताना अशा गोष्टीची काळजी (Care) घेतली पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी थोड्याच वेळात मतदान

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

SCROLL FOR NEXT