Kidney Health ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Kidney Health: रोजच्या आहारात 'या' पदार्थाचा करा समावेश, किडनी राहील निरोगी

किडनी हा शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवापैंकी एक आहे.मूत्रपिंड हे सर्वात महत्वाचे कार्य करते. शरीरातील नको असलेले टाकाऊ पदार्थ तसेच रक्त शुध्द करण्याचे काम किडनीच्या माध्यमातून होत असते.

Manasvi Choudhary

Kidney Health: किडनी हा शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवापैंकी एक आहे.मूत्रपिंड हे सर्वात महत्वाचे कार्य करते. शरीरातील नको असलेले टाकाऊ पदार्थ तसेच रक्त शुध्द करण्याचे काम किडनीच्या माध्यमातून होत असते.

किडनीची व्यवस्थित काळजी न घेतल्यास आपल्याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. ज्यामुळे किडनी स्टोन, पोटदुखी, थकवा, डोकेदुखी आणि शरीर सुजणे यांसारख्या समस्या उद्भवतात.यामुळेच किडनीचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

रोजच्या जीवनातील काही पदार्थ असे आहेत जे किडनीला हानी पोहोचतात यामुळे मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी काय काळजी घ्याल हे जाणून घ्या.किडनी हे नैसर्गिकरित्या शरीरातील रक्त शुध्द करण्याचे कार्य करते

पाणी

नियमितपणे पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे ज्यामुळे मूत्रपिंड स्वच्छ राहते. शरीर हे ६० टक्के पाण्याने बनलेले असते. मूत्रपिंडात मूत्र तयार करण्यासाठी पाण्याची गरज असते यामुळे पाणी कमी प्यायल्यास लघवीचे प्रमाण कमी होते ज्याचा परिणाम किडनीवर होतो यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.

Drinking Water

द्राक्षे

द्राक्षे खाल्ल्याने किडनीचे आरोग्य सुधारते. किडनीसंबंधीत आजार असल्यास द्राक्षाचा रस करून पिण्याचा सल्ला दिला जातो.

सफरचंद

आहारात सफरचंद खाल्ल्याने किडनी निरोगी राहते. सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर असते ज्यामुळे किडनी खराब होण्याचा धोका कमी होतो.

कडधान्ये

डाळींमध्ये खनिजे आणि प्रथिने असतात, जी किडनी निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. मूग, हरभरा, राजमा यांसारख्या कडधान्यांचे नियमित सेवन केल्याने मूत्रपिंडाची पोटॅशियमची गरज पूर्ण होते आणि ते त्यांचे कार्य योग्य प्रकारे करू शकतात.

मशरूम

किडनी निरोगी ठेवण्यासाठी मशरूम खूप महत्वाचे आहेत. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन डी हे पोषक घटक असतात, जे किडनीला आजारांपासून दूर ठेवतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : सुरज चव्हाणांचं प्रमोशन, दादांना पत्ताच नाही! अजित पवारांचा पक्ष हायजॅक?

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT