Bad Cholesterol Saam Tv
लाईफस्टाईल

Bad Cholesterol : खराब कोलेस्ट्रॉलला मुळासकट दूर करण्यासाठी 'या' चटणींचा होईल फायदा, पाहा रेसिपी !

Health Tips: वेळेस शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Remove Bad Cholesterol : लोकांच्या अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयमुळे शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉऐवजी वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक वाढत आहे. ज्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळेस शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे.

तुमच्या आहार हिरवी चटणीचा समावेश केल्याने तुम्हाला अनेक फायदे होतील. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी हिरव्या चटणीची रेसिपी घेऊन आलो आहोत , जे शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मदत करेल. ही चवदार आणि हेल्दी चटणी तुमच्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असेल चला तर मग जाणून घेऊया नक्की रेसिपी आहे तरी काय.

1. हिरवी चटणी बनवण्यासाठी साहित्य

पुदिना – २० ग्रॅम

हिरवी मिरची – आवश्यतेनुसार

कोथिंबीर – ५० ग्रॅम

लसुन – २० ग्रॅम

फ्लॅक्ससीडचे तेल – १५ ग्रॅम

इसबगोल – १५ ग्रॅम

मीठ – चवीनुसार

पाणी

लिंबाचा रस – १० मिली

2. पद्धत

हिरवी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर आणि पुदिना पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. आता एका ब्लेंडरमध्ये ,कोथिंबीर, मिरची, लसूण ,पुदिन्याची पाने, फ्लॅक्ससीडचे तेल,इसबगोल,लिंबाचा रस आणि थोड पाणी टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.खूप बारीक अशी चटणी तयार करून घ्या. ही चवदार चटणी तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचा प्रभाव कमी करेल आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

3. कोथिंबीर आणि पुदिनाच्या पानांचे फायदे

कोथिंबीर आणि पुदिना हे औषधी (Medicine) गुणधर्मांनी समृद्ध असतात.यामध्ये क्लोरोफिलचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच यात असलेले फायबरचे प्रमाण कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी मदत करतात.कोथिंबीर आणि पुदिनाचे पाने पचनसंस्था सुधारण्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात कोथिंबीर आणि पुदिनापासून चटणी बनवून समावेश करू शकता.

4. लसणाचे फायदे

लसणाचा वापर प्रत्येक पदार्थांमध्ये केला जातो अगदी मसूरपासून ते चिकनपर्यंत सर्व खाद्यपदार्थांमध्ये लसणाचा (Garlic) वापर केला जातो. तसेच या हिरव्या चटणीमध्ये लसण्याचा वापर नुसती चटणीची चवच वाढवत नाहीतर तुमच्या वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या समस्यादेखील दूर करण्यास मदत करते. लसुन रक्तपातळ करून रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.

5. इसबगोलचे फायदे

आरोग्याच्या अनेक फायद्यासाठी इसबगोल उपयुक्त ठरते. शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी इसबगोल मदत करते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या पासून दूर ठेवण्यासाठी,कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी इसबगोलचा वापर करता येतो.

6. फ्लॅक्ससीडचे होणारे फायदे (Benefits)

यामध्ये ओमेगा – 3 फॅट्स भरपूर प्रमाणात असते जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काम करते. डायबिटीज असणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फ्लॅक्ससीड फायदेशीर असते. त्यामुळे या हिरव्या चटणीमध्ये उपलब्ध असणारे साहित्य पूर्णपणे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी मदत करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT