Shreya Maskar
अनेकांना चपाती गोल लाटताना त्रास होतो. काही केल्या चपातीचा आकार गोल येत नसेल. तर घरगुती ट्रिक वापरा.
तुम्हाला पोळपाट लाटण्याचा वापर करून गोल चपाती करताना अडचण येत असेल तर घरी उपलब्ध असलेली ही एक वस्तू तुम्हाला खूप मदत करेल.
चपातीचा गोळा किचन प्लॅटफॉर्मवर ठेवून त्यावर मोठी प्लास्टिक शीट पसरवा. जास्त पातळ आणि जाड शीट घेऊ नका.
आता प्लास्टिकवर गोल चपातीच्या आकाराच्या बशीने दाबून चपातीचा आकार द्या.
अशाप्रकारे हात खराब न होता, पोळपाट लाटण्याचा वापर न करता झटपट गोल चपात्या तयार होतील.
ही ट्रिक वापरायची असेल तर पीठ जास्त पातळ घट्ट असणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर पीठ प्लास्टिकला चिकटते.
प्लास्टिकवर हलक्या हाताने दाब द्या. नाहीतर चपाती तुट शकते. त्यामुळे चपातीचे पीठ योग्य पद्धतीने मळणे गरजेचे आहे.
एक चपाती झाल्यावर पटकन शेकवून घ्या. जास्त वेळ ठेवू नका. नाहीतर चपातीचे पीठ सुकते.