Heart artery blockage signs saam tv
लाईफस्टाईल

Heart artery blockage signs: हार्ट वेन्स ब्लॉक झाल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही या रेड फ्लॅग्सकडे दुर्लक्ष करू नका

Blocked heart veins symptoms: हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये (Veins) अडथळे निर्माण होतात, तेव्हा त्याला 'ब्लॉकेज' (Blockage) असे म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • हृदयविकाराची लक्षणे सौम्य असू शकतात.

  • छातीत दडपण हृदयविकाराचे सामान्य लक्षण आहे.

  • मळमळ किंवा उलटी ही गंभीर लक्षणे आहत.

बर्‍याचदा लोकांना वाटतं की हृदयाशी संबंधित समस्या आल्या की त्याची लक्षणं लगेच दिसून येतात. पण खरंतर असं नसतं. अनेकदा हृदयविकाराची लक्षणं अगदी सौम्य असतात किंवा अजिबात स्पष्ट दिसून येत नाहीत. खास करून ज्यांचं वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे, जास्त वजन आहे, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढलेला आहे, अशा व्यक्तींना जास्त सावध राहण्याची गरज आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशावेळी व्यक्तींना शरीरात होणारे बदल ओळखले पाहिजेत. हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर काही लक्षणं दिसून येतात, ही लक्षणं नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया.

छातीत दुखणं किंवा दडपण

हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यास किंवा हार्ट अटॅकच्या वेळी छातीत दुखणं, दडपण वाटणं ही सर्वात सामान्य लक्षणं आहेत. हे दुखणं काही मिनिटं टिकून राहतं आणि आराम केल्यानंही कमी होत नाही. जर दुखणं हलकं असेल आणि दाबल्यावर वाढत असेल, तर ते हृदयाशी संबंधित नसून स्नायूंचं असू शकतं.

उलटी होणं किंवा मळमळ

हार्ट अटॅकच्या वेळी अनेकांना उलटीसारखं वाटणं, अॅसिडिटी किंवा मळमळ होऊ शकते. हे लक्षण विशेषत: महिलांमध्ये जास्त आढळतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका

डाव्या बाजूला दुखणं पसरत जाणं

हार्ट अटॅकचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे छातीपासून सुरू झालेलं दुखणं हळूहळू डाव्या हातात, खांद्यामध्ये किंवा पाठीपर्यंत पसरतं. हे दुखणं वाढत जातं आणि संपूर्ण शरीर अस्वस्थ करतं.

अचानक चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं

जर अचानक चक्कर आली, तोल गेला आणि त्यासोबत छातीत दुखणं किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे हृदयाच्या गंभीर लक्षण असू शकतं.

जबड्यात आणि गळ्यात दुखणं

साधारणपणे गळा किंवा जबड्यातलं दुखणं सर्दी-जुकाम किंवा स्नायूंच्या ताणामुळे होतं. पण जर हे दुखणं छातीतील दडपणासोबत गळा किंवा जबड्यापर्यंत पसरलं, तर ते हार्ट अटॅकचं संकेत असू शकतं.

धमन्या पूर्णपणे ब्लॉक झाल्यावर परिणाम

धमन्यांमधील ब्लॉकेज वेगवेगळ्या टप्प्यांवर होऊ शकतो. ९७ टक्के ब्लॉकेज असताना उपचार करणं तुलनेनं सोपं असतं. पण जर धमनी पूर्णपणे आणि खूप काळापासून बंद असेल तर धोका वाढतो. अशावेळी शरीरात नवीन छोट्या रक्तवाहिन्या तयार होतात. त्या रक्तपुरवठा करतात, पण पुरेसा नसल्यामुळे छातीत दुखणं आणि श्वास घेण्यास त्रास जाणवतो.

हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

छातीत दुखणे किंवा दडपण वाटणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे.

महिलांमध्ये हार्ट अटॅकची कोणती लक्षणे जास्त दिसतात?

महिलांमध्ये मळमळ, उलटी किंवा अॅसिडिटीसारखी लक्षणे जास्त दिसतात.

हार्ट अटॅकच्या वेळी दुखणे कोठपर्यंत पसरू शकते?

दुखणे छातीतून डाव्या हातात, खांद्यात किंवा पाठीपर्यंत पसरू शकते.

अचानक चक्कर आल्यास काय करावे?

छातीत दुखणे असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे.

जबड्यात दुखणे कोणत्या आजाराचा इशारा असू शकते?

जबड्यात दुखणे हार्ट अटॅकचा इशारा असू शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank News : 'या' बँकेत मिळणार १ वर्षापेक्षा जास्त मुदत ठेवीची ऑफर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात

Vivo T4 Pro 5G: तीन दिवसात लॉन्च होणार Vivo चा बजेट फोन, जाणून घ्या धमाकेदार फीचर्स

Genelia Deshmukh: तुला पाहिलं अन् हृदय धडधडू लागलं...

Pune News: पुण्यात अल्पवयीन टोळक्याचा राडा, वाहनांची तोडफोड करुन परिसरात भीतीचे वातावरण|VIDEO

SCROLL FOR NEXT