Liver health Saamtv
लाईफस्टाईल

Liver Swelling: यकृताला सूज आल्यावर शरीरात दिसतात 'हे' मोठे बदल; इग्नोर करणं पडू शकतं महागात

Symptoms Of Liver Swelling: यकृताला सूज हा देखील या आजारांपैकी एक आहे. फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस, इन्फेक्शन, लिव्हर कॅन्सर आणि हार्ट फेल्युअर अशा अनेक कारणांमुळे यकृताला सूज येऊ शकते.

Surabhi Jayashree Jagdish

यकृत म्हणजेच लिव्हर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव मानला जातो. हे शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याचं काम करतं. यकृतामध्ये थोडीशीही समस्या आढळल्यास शरीराच्या अनेक भागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृत निरोगी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे लोकांमध्ये यकृताशी संबंधित समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. यकृताला सूज हा देखील या आजारांपैकी एक आहे. फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस, इन्फेक्शन, लिव्हर कॅन्सर आणि हार्ट फेल्युअर अशा अनेक कारणांमुळे यकृताला सूज येऊ शकते. यकृताला सूज आल्यावर शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणे वेळीच ओळखली तर ही समस्या टाळता येऊ शकते. ही लक्षणं कोणती आहेत ते जाणून घेऊया.

अधिक थकवा

यकृताला सूज आल्यास रुग्णाला तीव्र थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. शिवाय यावेळी शरीरातील उर्जा पातळी कमी होते. ज्यामुळे व्यक्तीला नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. योग्य खाल्ल्यानंतरही तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

पोटदुखी

यकृताला सूज आली असल्यास पोटदुखी होण्याची समस्या असू शकते. अशा स्थितीत व्यक्तीला सतत पोट जडपणा जाणवू शकतं. साधारणपणे ही वेदना पोटाच्या वरच्या उजव्या भागात जाणवतात. ही वेदना सौम्य किंवा तीव्र असू शकतात.

डोळ्याच्या खाली पिवळेपणा

जर तुम्हाला अचानक तुमच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्याच्या खाली पिवळेपणा दिसून आला तर ते यकृताला सूज येण्याचं लक्षणं असू शकतं. ज्यावेळी यकृत योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा रक्तातील बिलीरुबिनची पातळी वाढू लागते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा होतो.

लघवीचा रंग गडद होणं

यकृताला सूज आल्यास तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा काही प्रमाणात तपकिरी होऊ शकतो. ज्यावेळी यकृत योग्यरित्या काम करत नाही तेव्हा शरीरात बिलीरुबिनची पातळी वाढते, ज्यामुळे लघवीचा रंग गडद होऊ शकतो. हे लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

SCROLL FOR NEXT