Kitchen tips in Marathi, How to store food in freezer ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

फ्रीजरमध्ये अन्नपदार्थ साठवताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण रेफ्रिजरेटरचा वापर करतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फ्रीज ही आजकाल प्रत्येकाची गरज बनत चालली आहे. खाद्यपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण रेफ्रिजरेटरचा वापर करतो. एखादा पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी आपण फ्रीजसोबत फ्रीजरचा वापर करतो. (Kitchen tips in Marathi)

हे देखील पहा -

अधिक काळ अन्नपदार्थ साठवण्यासाठी आपण फ्रीजरचा वापर करत जरी असलो तरी त्याची काळजी घेतो का ? फ्रीजरचे तापमान फ्रीजच्या तुलनेत खूपच कमी असते. अशावेळी आपण फ्रीजर वापरत असूनही त्याच्या योग्य वापर करण्याच्या पद्धतींबाबत गैरसमज निर्माण करुन घेतो. फ्रीजरमध्ये अन्नपदार्थ कसे साठवायचे व यासोबतच आपला फ्रीजरही बराच काळ कसा कार्य करेल हे पाहूया

अशी घ्या फ्रीजरची काळजी (Care)-

१. कोणतेही अन्नपदार्थ गरम असताना फ्रीजरमध्ये ठेवू नका. थंड (Cold) करुन मग फ्रीजरमध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये गरम पदार्थ ठेवल्याने फ्रीझरचे तापमान वाढते आणि फ्रीजरमध्ये ठेवलेले इतर अन्न डिफ्रॉस्ट होऊ शकते.

२. फ्रीजरमध्ये अन्न साठवण्यापूर्वी ते व्यवस्थित झाकून ठेवा. त्यामध्ये फ्रीजचे पाणी (Water) जाणार नाही याची काळजी घ्या. असे न केल्यास 'फ्रीझर बर्न' होऊ शकते.

३. फ्रीजरमध्ये अधिक काळ अन्नपदार्थ साठवून ठेवू नका. आवश्यक तितकेच पदार्थ साठवा. फ्रीजर खूप भरलेला असल्यास तो खूप स्लो चालतो व त्यामुळे फ्रीज खराब होऊ शकते.

४. जर आपण फ्रीजरमध्ये अधिक खाद्यपदार्थ ठेवत असू तर त्यांना लेबल लावा त्यामुळे आपल्याला हवे असणारे पदार्थ सहज मिळतील. कच्चे अन्न आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा.

५. फ्रीजरचा वापर आपण नियमित करत असू तर त्यात बर्फ गोठू देऊ नका. बर्फ गोठल्यास आपण काही काळ फ्रीजर डीफ्रॉस्ट करू शकतो. त्यामुळे जमा झालेला बर्फ वितळण्यास मदत होईल व अन्नपदार्थ सुरक्षित राहिल.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar: 'रात्रीस खेळ चाले' फेम 'शेंवता'ची सिंगापूर ट्रिप, खास व्यक्तीसोबतचे फोटो केले शेअर

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

SCROLL FOR NEXT