Interest On FDs Saam Tv
लाईफस्टाईल

Interest On FDs : या 8 बँक देतायत एफडीवर 8 टक्क्यांहून जास्त व्याज, सीनियर सिटीजनांसाठी अत्यंत फायदेशीर

Interest On FDs : जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा विचार करत असाल तर, ही वेळ तुमच्यासाठी चांगली ठरू शकते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

FDs Interest : जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा विचार करत असाल तर, ही वेळ तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. कारण की अनेक बँक एफडीवर जास्त लोन देत आहेत.

भारतीय (Indian) रिजर्व बँकतर्फे रेपो रेट मध्ये अनेकवेळा वाढ झाल्याने फिक्स्ड डिपॉझिटचे सुध्दा रेट वाढतात. मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत आरबीआईने रेपो रेटमध्ये 2.5 टक्के वाढ केली आहे. 8 फेब्रुवारीला केंद्रीय बँकेने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटचा ईफाजा केला आहे.

सिनियर सिटीजनला बँक (Bank) फिक्स्ड डीपॉजिटवर सामान्य नागरिकांच्या तुलनेत 50 टक्के जास्त व्याज मिळते. इथे अशा 8 बँकेमध्ये माहिती दिली जात आहे की, ज्येष्ठ व्यक्तींना 8 टक्के जास्त व्याज दिला जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते आहेत ते बँक.

या 8 बँका देत आहेत सिनियर सिटीजनला उच्च व्याज -

बंधन बँक एफडी रेट -

सिनियर सिटीजनला बंधन बँक 600 दिवसांसाठी 8.50 टक्के व्याज देत आहेत.

येस बँकेची एफडी -

स्पेशल फिक्स्ड डिपॉझिटसाठी प्रायव्हेट सेक्टरची ही बँक 35 महिन्यांसाठी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज देत आहेत. सोबतच 25 महिन्यांसाठी 8 टक्के व्याज देत आहे.

एक्सिस बँक एफडी रेट -

एक्सिस बँकेने सिनिअर सिटीजनसाठी दोन वर्षांपेक्षा जास्त आणि 30 महिन्यांपेक्षा कमी एफडीवर 8 टक्क्यांनी व्याज देणार आहेत.

इंडसइंड बँक एफडी -

सीनियर सिटीजनला ही बँक दोन वर्ष एक महिन्यापासून दोन वर्ष सहा महिन्यांपेक्षा कमीच्या टेन्योरवर एफडी 8.25 टक्के देत आहे. सोबतच दोन वर्ष नऊ महिन्यांना घेऊन तीन वर्ष आणि तीन महिन्यांच्या एफडीवर 8.25 टक्के व्याज दिला जातं आहे.

सूर्योदय एफडी रेट -

सिनिअर सिटीजनसाठी ही बँक एफडी रेटवर एक वर्ष सहा महिन्यांपेक्षा अधिक आणि दोन वर्षांसाठी 8.51 टक्के व्याज देत आहे. 999 दिवसाच्या एफडीवर 8.76 टक्के एवढा व्याज दिला जात आहे.

बँक एफडी -

453 दिवसांपासून 459 दिवसापर्यंत 8.30 टक्के व्याज, 460 दिवसांपासून ते 724 दिवसांसाठी 8.30 टक्के व्याज आणि स्पेशल 725 दिवसांसाठी 8.30 टक्के व्याज देत आहेत.

DCB बँक एफडी रेट -

700 दिवसांपेक्षा अधिक आणि 36 महिन्यांच्या एफडीवर 8.35 टक्के व्याज दिल्या जात आहे.

इक्विटास स्माल फायनान्स बँक -

ही बँक सीनियर सिटीजनला एफडीवर 888 च्या टेन्योरसाठी 8.5 टक्के व्याज देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa 2 Pre-Booking: झुकेगा नही! 'पुष्पा 2'ची रिलीजआधीच बंपर कमाई; परदेशातही बोलबाला, कोट्यवधी रुपयांची कमाई

Maharashtra News Live Updates: देवगिरी बंगल्यावर नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा

Budh Ast: 5 दिवसांनी बुध ग्रह होणार अस्त; किरकोळ चुकीमुळे 'या' राशींचं होणार मोठं नुकसान, अडचणीही येणार

Nandurbar Election results : काँग्रेसचा गड कोसळला, नंदुरबारमध्ये ३ जागांवर महायुतीचा दणदणीत विजय

Daily Horoscope: आज 'या' राशी होणार मालामाल; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT