Serious kidney cancer signs saam tv
लाईफस्टाईल

Kidney cancer: किडनी कॅन्सर झाल्यावर शरीरात 'हे' 7 बदल दिसून येतात; 99% लोकं सामान्य समजून दुर्लक्ष करतात

Serious kidney cancer signs: किडनीच्या कॅन्सरची जेव्हा लक्षणे दिसू लागतात, तेव्हा ती इतकी सामान्य वाटू शकतात की ९९% लोकं त्यांना दैनंदिन थकवा, किरकोळ आजार किंवा इतर सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • किडनी कॅन्सर म्हणजे किडनीच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊन ट्यूमर तयार होणे.

  • हा कॅन्सर जनुकीय बदलांमुळे होतो आणि शरीराच्या इतर भागात पसरू शकतो.

  • धूम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कुटुंबातील इतिहास यामुळे किडनी कॅन्सरचा धोका वाढतो

किडनी म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचा अवयव. किडनी आपल्या शरीरात रक्त शुद्ध करण्याचं काम करते. पण कधी कधी या किडनीमध्ये असामान्य पेशी वाढू लागतात आणि त्या एक ट्युमर तयार होतो. अशा प्रकारची पेशी वाढ अनियंत्रित होत गेली तर ती कॅन्सरमध्ये बदलू शकते. यालाच किडनी कॅन्सर म्हणतात.

किडनी कॅन्सर कसा होतो?

शरीरात काही वेळा जनुकीय बदल (genetic mutation) होतात, ज्यामुळे पेशींचं नैसर्गिक वाढीचं नियंत्रण बिघडतं. या अनियंत्रित पेशी किडनीमध्ये वाढून ट्युमर तयार करतात. ही गाठ हळूहळू कॅन्सरमध्ये रुपांतरित होऊ शकतं आणि शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकते. या प्रक्रियेला मेटास्टेसिस म्हणतात.

किडनी कॅन्सर होण्याची शक्यता कोणाला जास्त?

  • काही विशिष्ट कारणांमुळे या आजाराचा धोका वाढतो. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:

  • धूम्रपान – सिगरेट किंवा तंबाखू वापरणाऱ्यांमध्ये किडनी कॅन्सरचा धोका दुपटीने वाढतो.

  • लठ्ठपणा– शरीरात अतिरिक्त चरबी असल्यास पेशींच्या वाढीवर परिणाम होतो, ज्यामुळे कॅन्सरची शक्यता वाढते.

  • उच्च रक्तदाब– दीर्घकाळ उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये किडनीवर ताण येतो.

  • कौटुंबिक इतिहास– जर कुटुंबात कोणाला किडनीशी संबंधित गंभीर आजार झाला असेल, तर कॅन्सरचा धोका थोडा जास्त असतो.

सुरुवातीला दिसत नाहीत लक्षणं

किडनी कॅन्सरची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे याच्या सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे तो बऱ्याच वेळा उशिरा लक्षात येतो. मात्र त्यावेळी तो इतर भागांमध्ये पसरलेला असतो. मात्र जसजसा कॅन्सर वाढतो, तसतशी काही लक्षणं हळूहळू दिसायला लागतात.

किडनी कॅन्सरची लक्षणं

लघवीत रक्त

लघवीचा रंग गुलाबी, लालसर दिसू शकतो. हे एक पहिलं आणि महत्वाचं लक्षणं असून, दुर्लक्ष करून चालत नाही.

पाठीच्या खालच्या भागात वेदना

किडनीच्या कॅन्सरमध्ये पाठीच्या खालच्या भागात वेदना जाणवू लागतात. यावेळी या वेदना सतत होऊ लागतात. अनेकदा मांड्यांपर्यंत या जाणवतात आणि सामान्य पाठीच्या दुखण्यासारख्या वाटतात पण आराम किंवा औषधांनी कमी होत नाहीत.

किडनीजवळ गाठ किंवा सूज

कधी कधी शरीराच्या बाजूला किंवा पाठीच्या खालच्या भागात गाठ किंवा सूज जाणवू शकते. हे देखील किडनीच्या कॅन्सरचं एक लक्षण मानलं जातं.

सतत थकवा

भरपूर झोप घेतल्यानंतरही शरीरात थकवा जाणवतो. कामात उत्साह वाटत नाही आणि सतत झोपल्यासारखं वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्या. याचं कारण म्हणजे हे देखील किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असतं.

भूक मंदावणं

या कॅन्सरवेळी जेवायची इच्छा राहत नाही किंवा खाण्याचं प्रमाण खूपच कमी होतं. विशेष म्हणजे कोणताही आहार बदल न करता भूक कमी होते.

अनपेक्षित वजन कमी होणं

कसलाही डाएट न करता, अचानक वजन कमी होणं हे देखील किडनीच्या कॅन्सरचं एक लक्षण आहे. हा बदल अनेकदा हळूहळू होत जातो.

हिमोग्लोबिनची कमतरता

रक्तामध्ये लाल पेशींची संख्या कमी झाल्यामुळे थकवा, श्वास लागणे आणि थंडी वाजणे अशी लक्षणं दिसतात. हे किडनी कॅन्सरचं लक्षण असून याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

किडनी कॅन्सर म्हणजे काय?

किडनीच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊन ट्यूमर तयार होणे त्याला किडनी कॅन्सर म्हणतात.

किडनी कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती?

लघवीत रक्त, पाठीचा दुखणे, गाठ जाणवणे, थकवा आणि अचानक वजन कमी होणे.

किडनी कॅन्सर होण्याचे मुख्य कारण काय आहे?

जनुकीय बदलामुळे पेशींच्या वाढीवरील नियंत्रण मोडून अनियंत्रित वाढ होते.

किडनी कॅन्सरचा धोका कोणाला जास्त असतो?

धूम्रपान करणारे, लठ्ठ व्यक्ती, उच्च रक्तदाब असणारे आणि कुटुंबात कॅन्सरचा इतिहास असणारे लोक.

किडनी कॅन्सर ओळखण्यासाठी काय करावे?

लघवीत रक्त, थकवा, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री नाराज असल्यावर दरेगावी जातात? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT