Fatty liver SAAM TV
लाईफस्टाईल

Fatty liver: लिव्हरवरची चरबी काढून टाकतील 'या' ५ भाज्या, आजपासून करा आहारात समावेश

Fatty liver diet: फॅटी लिव्हरचा धोका चुकीचा आहार आणि बैठ्या जीवनशैलीमुळे वाढू शकतो. पालक, ब्रोकोली, बीटरूट, कारलं आणि लसूण यांसारख्या भाज्या संतुलित आहाराचा भाग कशा ठरू शकतात, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

सध्याच्या काळात फॅटी लिव्हरची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतेय. चुकीचा आहार, जास्त तेलकट आणि अयोग्य खाणं, मद्यपान तसंच दिवसभर बसून राहण्याची सवय यामुळे याचा धोका वाढतो. मात्र आहारात काही आरोग्यदायी भाज्यांचा समावेश केल्यास लिव्हरच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.

लिव्हर म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचा अवयव. शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढणं, चरबी आणि पोषक घटकांवर प्रक्रिया करणं अशी अनेक महत्त्वाची कामं लिव्हर करतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे लिव्हरमध्ये जास्त चरबी जमा होऊ लागते. यालाच फॅटी लिव्हर म्हटलं जातं. वेळीच काळजी घेतली नाही तर लिव्हरला सूज येऊन पुढे गंभीर नुकसान होण्याचा धोका असतो.

भाज्या आणि फळांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि फायबर लिव्हरसाठी उपयुक्त ठरतात. यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी करण्यास मदत होऊ शकते. फेलिक्स लिव्हर केअरमधील वरिष्ठ हेपॅटोलॉजिस्ट डॉ. रौनक मेहता यांच्या मते, आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्यास फॅटी लिव्हरची समस्या बऱ्याच प्रमाणात सुधारू शकते. लिव्हर असा अवयव आहे जो स्वतःला ठीक करण्याची क्षमता ठेवतो. त्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळणं महत्त्वाचं आहे.

डॉ. मेहता यांनी फॅटी लिव्हरच्या काळात आहारात समावेश करता येतील अशा ५ भाज्यांबाबत माहिती दिली आहे.

पालक

पालकामध्ये क्लोरोफिल आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील घातक पदार्थांशी लढण्यास आणि लिव्हरच्या कामाला मदत होऊ शकते. पालकातील घटक लिव्हरच्या एन्झाइम्सच्या कामासाठीही उपयुक्त ठरतात. तसंच शरीरातील सूज कमी करण्यास मदत होऊ शकते.

डॉ. मेहता यांच्या मते, पालक हलका शिजवून रोजच्या जेवणात घेणं फायदेशीर ठरू शकतं.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये ग्लुकोसिनोलेट्स नावाचे घटक असतात. हे घटक लिव्हरमध्ये शरीरातील घातक पदार्थांवर प्रक्रिया करणारे एन्झाइम तयार होण्यास मदत करतात. ब्रोकोली नियमित आहारात घेतल्याने लिव्हरमधील चरबी आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे फॅटी लिव्हर असणाऱ्या व्यक्तींसाठी ही भाजी आहाराचा एक चांगला भाग ठरू शकते.

बीटरूट

बीटरूटमध्ये बेटाइन नावाचा घटक असतो. हा घटक लिव्हरच्या पेशींचं संरक्षण करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे शरीराला चरबी कमी करण्यास आणि काही घातक पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. डॉ. मेहता यांच्या मते, आठवड्यात काही वेळा ताज्या बीटरूटचा रस घेता येऊ शकतो. मात्र फॅटी लिव्हरचा उपचार म्हणून केवळ बीटरूटच्या रसावर अवलंबून राहू नये.

कारलं

कारल्याला अनेक जण कडू चवीमुळे टाळतात. मात्र फॅटी लिव्हरच्या बाबतीत ते उपयोगी ठरू शकतं. कारल्यातील काही घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता सुधारण्यास मदत करू शकतात. रक्तातील साखर आणि इन्सुलिनशी संबंधित समस्या फॅटी लिव्हरशी जोडलेल्या असू शकतात.

लसूण

लसूण हा मसाल्याचा पदार्थ असला तरी त्याचे अनेक आरोग्यदायी गुण आहेत. लसूण लिव्हरमधील काही एन्झाइम एक्टिव्ह करण्यास मदत करू शकतो. यामुळे शरीरातील घातक पदार्थांवर प्रक्रिया होण्यास मदत होते. तसंच लसूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करण्यासही मदत करू शकतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला प्रतिसाद; शेतकरी मदतीवरून एकनाथ शिंदेंचा सवाल

विधिमंडळाचे उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्षांचे अधिकारांना कात्री; लोकशाहीच्या मंदिरात संघर्ष पेटला

Car Cabin Air Filter: कारची एसी फुल्ल, पण कुल होत नाही, केबिन फिल्टर कधी बदलावा?

LPG सब्सिडी मिळत नाहीये का? खात्यात पैसे का येत नाहीयेत? घरी बसून चेक करा स्टेट्स

Horoscope : उद्यापासून या 4 राशींना धनलाभ होणार; मोठ्या समस्येतून होईल सुटका

SCROLL FOR NEXT