'या' ५ कारणांमुळे होऊ शकतो गर्भपात   Saam Tv News
लाईफस्टाईल

'या' ५ कारणांमुळे होऊ शकतो गर्भपात, वाचा सविस्तर

काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये स्त्रीला गर्भधारणेच्या काळात सतर्क राहण्याची गरज असते. काही वैद्यकीय परिस्थितीमुळे गर्भपात (miscarriage) होण्याची दाट शक्यता असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जेव्हा एखादी स्त्री गर्भवती (Pregnant) असते, तेव्हा तिचा हा आनंद संपूर्ण कुटुंबाशी जोडलेला असतो. विशेषतः बाळाचे पालक हे त्याच्या जन्मापुर्वीच आपल्या बाळाशी भावनिकरित्या जोडले जाता. गर्भधारणेदरम्यान तिच्या ज्या काही भावना असतात, त्या ती नेहमी आपल्या पतीशी शेअर करत असते. या काळात पती पत्नी दोघेही मिळून हा सुंदर क्षण जगत असतात आणि त्यांच्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात.

हे देखील पहा-

परंतू, अनेकदा काही गोष्टींमुळे महिलांचा गर्भपात (miscarriage) होतो, त्यामुळे महिलांना मानसिकदृष्ट्या खचून जातात. याचा परिणाम केवळ स्त्रीवरच नाही तर तिच्या पतीवरही होतो. तज्ज्ञांच्या मते, गर्भपाताचे (miscarriage) नेमके कारण सांगता येत नाही, परंतु काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये स्त्रीला गर्भधारणेच्या काळात सतर्क राहण्याची गरज असते. काही वैद्यकीय परिस्थितीमुळे गर्भपात होण्याची दाट शक्यता असते.

- थायरॉईड: थायरॉईड ही आजकाल एक अतिशय सामान्य समस्या आहे. या समस्येचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. साधारणपणे, स्त्रिया ही समस्या सामान्य मानतात, परंतु जर तुम्हाला गर्भधारणेदरम्यान थायरॉईड असेल तर तुम्ही खूप सावध असणे आवश्यक असते, कारण ही हार्मोनशी संबंधित समस्या आहे. थायरॉईड असलेल्या महिलांनी गरोदरपणात डॉक्टरांच्या देखरेखीखाली असणे खूप महत्वाचे आहे, कारण कधीकधी थायरॉईड गर्भपात होण्याचे कारण बनू शकतो.

- मधुमेह : अनेक महिलांना गर्भधारणेदरम्यान मधुमेह होतो. अशा परिस्थितीत महिलांनी वेळोवेळी तज्ञांकडून स्वतःची तपासणी करत राहाणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहामुळे कधीकधी सुरुवातीच्या महिन्यात गर्भपात होऊ शकतो. या व्यतिरिक्त, मधुमेहामुळे होणाऱ्या बाळांमध्ये विकार होण्याचा धोकाही असतो.

- गुणसूत्र विकृती: गर्भाधारणेसाठी शुक्राणू आणि अंडी दोन्ही 23 गुणसूत्र एकत्र करून एक परिपूर्ण जुळणी तयार करतात. ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यात थोडीशी त्रुटी देखील गुणसूत्र विकृती निर्माण करू शकते आणि यामुळे गर्भपात देखील होऊ शकतो.

- हार्मोनल असंतुलन : जर एखाद्या महिलेला आधीच हार्मोनल समस्या असेल किंवा गर्भाशयाच्या आवरणाला आधार देण्यासाठी आवश्यक असलेले प्रोजेस्टेरॉन हार्मोन महिलेच्या शरीरात तयार होत नसतील, जे तर गर्भपात होण्याची शक्यता वाढते. जर ही समस्या वेळीच समजली तर औषधांद्वारे ही स्थिती नियंत्रित केली जाऊ शकते.

- फायब्रॉईड्स: गर्भाशयाच्या फायब्रॉड, गर्भाशयाचे दोष किंवा स्वयं रोगप्रतिकार विकार देखील कधीकधी गर्भपाताला कारणीभूत ठरतात. अशा कोणत्याही वैद्यकीय स्थितीच्या बाबतीत, आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, तसेच तज्ञांच्या सूचनांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे जेणेकरून गर्भपातासारखी समस्या टाळता येईल.

(टिप- येथे दिलेली माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे, अधिक माहितीसाठी तज्ञ्जांचा सल्ला घ्यावा.)

Edited By - Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT