Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : 'या' 5 चुकांमुळे उभा राहिल तुमच्या समोर कर्जाचा डोंगर, लगेच या टिप्स फॉलो करा

Vastu Tips in marathi : वास्तूनुसार काही काम केले पाहिजे, जेणेकरून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home : वास्तुशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने दैनंदिन जीवनात केलेल्या कृतींचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम नक्कीच होतात. म्हणूनच असे म्हटले जाते की वास्तूनुसार काही काम केले पाहिजे, जेणेकरून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी संकटे येतात, ज्याची भरपाई दीर्घकाळापर्यंत करावी लागते. त्याचप्रमाणे कर्जात बुडलेली व्यक्ती आयुष्यभर त्याची परतफेड करत राहते.

वास्तुशास्त्रानुसार वास्तुशी संबंधित काही चुका व्यक्तीला कर्जाच्या ओझ्याखाली टाकतात. म्हणूनच या चुका तातडीने सुधारणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या, व्यक्तीने कोणत्या चुका टाळाव्यात.

1. घरातील या ठिकाणी डस्टबिन ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार घरातील (Home) प्रत्येक गोष्टीची दिशा ठरवलेली असते. तसेच डस्टबिन अशा प्रकारे कुठेही ठेवू नये. म्हणूनच घराबाहेर किंवा प्रवेशद्वारावर कधीही डस्टबिन ठेवू नका. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. यासोबतच समाजात मान-सन्मान कमी होतो. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा.

2. अंथरुणावर खाऊ नका

वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने अंथरुणावर बसून कधीही जेवू नये. कारण यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि सुख-समृद्धीमध्ये खूप अडथळे येतात.

3. रात्री खरकटी भांडी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये (Kitchen) घाण भांडी कधीही ठेवू नयेत. काही कारणास्तव तुम्ही त्यांना रात्री धुवू शकत नसाल तर त्यांना स्वयंपाकघरात ठेवू नका. रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ करा. असे केल्याने माँ अन्नपूर्णासोबत माँ लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो.

Vastu Tips

4. संध्याकाळी या वस्तूंचे दान करू नका

वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी दूध (Milk), दही, मीठ इत्यादी दान कधीही करू नये. असे केल्याने आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होतो.

5. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नका

बाथरूममध्ये रिकाम्या बादल्या, टब इत्यादी कधीही ठेवू नयेत. बाथरूममध्ये नेहमी किमान एक बादली पाण्याने (Water) भरलेली ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्ती आर्थिक समस्यांपासून वाचते. सोबतच दुसरी बादली उलटी ठेवावी.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT