Eye Care Tips 
लाईफस्टाईल

Eye Care: उन्हाळ्यात 'या' 5 डोळ्यांच्या समस्या गंभीर ठरू शकतात; वेळीच सल्ला घेणं गरजेचं

Eye Care Tips for Summer: उन्हाळ्यात डोळ्यांचे रक्षण करणे हे त्वचेला सनस्क्रीन लावण्याइतकेच महत्त्वाचे आहे. या सोप्या खबरदारी घेतल्यास, तुम्ही तुमचे डोळे निरोगी आणि आरामदायी ठेवत ऋतूचा आनंद घेऊ शकता.

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळा म्हणजे सूर्यप्रकाश, बाहेरची कामे आणि वाढलेले तापमान. परंतु ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी अनोखी आव्हाने देखील निर्माण करू शकते. उन्हाळ्यात येणाऱ्या डोळ्यांच्या पाच सामान्य समस्या तुमची दृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

डोळे कोरडे पडणे

ओजस मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल्सच्या सल्लागार नेत्रतज्ज्ञ लासिक आणि कॅटरॅक्ट सर्जन डॉ. अंकिता मुलचंदानी यांनी सांगिललं की, उष्ण, कोरडे हवामान आणि एअर कंडिशनिंगमुळे तुमच्या डोळ्यांमधील ओलावा कमी होऊन जळजळ, लालसरपणा आणि शुष्कपणा निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी, वाऱ्याचा संपर्क कमी करण्यासाठी लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरा आणि रॅप-अराउंड सनग्लासेस घाला.

युव्ही डॅमेज

अल्ट्राव्हायोलेट (युव्ही) किरणांच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्याने तुमच्या डोळ्यांना हानी होऊन कालांतराने मोतीबिंदू आणि मॅक्युलर डीजनरेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. युव्हीए आणि युव्हीबी किरणांपासून 100% संरक्षण करणारे गॉगल्स वापरा तसेच अतिरिक्त संरक्षणासाठी रुंद काठाची टोपी वापरा.

स्विमर्स आय (केमिकल कंजंक्टीव्हायटीस)

तलावातील क्लोरीनयुक्त पाण्याचा डोळ्यांना त्रास होऊ शकतो, ते नॅचरल टीअर फिल्म काढून टाकू शकते ज्यामुळे लालसरपणा, खाज सुटणे आणि अस्वस्थता निर्माण करू शकते. स्विम गॉगल घालल्याने क्लोरीन आणि इतर पूल रसायनांचा थेट संपर्क टाळता येतो.

डोळ्यांचे संसर्ग

उबदार वातावरणात बॅक्टेरिया आणि विषाणू वाढतात आणि एकमेकांचे टॉवेल वापरल्याने किंवा न धुतलेल्या हातांनी डोळ्यांना स्पर्श केल्याने कंजंक्टीव्हायटीस (गुलाबी डोळा) सारखे संसर्ग होऊ शकतात. स्वच्छता पाळा आणि एकमेकांच्या वस्तु वापरणे टाळा.

अ‍ॅलर्जी

उन्हाळ्यात परागकणांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे डोळे पाणावणे लाल होणे किंवा त्यांना खाज सुटणे यासारख्या अ‍ॅलर्जीक प्रतिक्रिया निर्माण होतात. ओव्हर-द-काउंटर मिळणारे अँटीहिस्टामाइन आय ड्रॉप्स आराम देऊ शकतात आणि परागकणांचे प्रमाण जास्त असणाऱ्या वेळेत घरात राहिल्याने त्यांचा संपर्क कमी होण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

SCROLL FOR NEXT