Manasvi Choudhary
तुळशी हे आयुर्वेदिक आहे. तुळशीच्या पानांचा उपयोग त्वचा व केसांसाठी केला जातो. तुळशीच्या अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, खनिजे, फायबर, प्रथिने आणि युजेनॉल सारखे घटक असतात पानांमध्ये हे घटक असतात यामुळे तुळशीची पाने त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
तुळशीच्या पानांचा फेसपॅक तुम्ही त्वचेवर राहिल्यास त्वचा उजळते. घरच्या घरी देखील तुम्ही तुळशीच्या पानांचा फेसपॅक बनवू शकता.
तुळशीच्या पानांचा फेसपॅक बनवण्यासाठी तुळशीच्या पानांचा पावडर करा. एका भांड्यात तुळशीच्या पानांची पावडर, दही हे मिक्स करून घ्या. मिश्रण चांगले फेटून घ्या.
संत्र्याची सालमध्ये देखील तुळशीच्या पानांची पावडर मिक्स करून चेहऱ्याला लावू शकता.
तुळशीची पावडर आणि चंदन पावडर याचे मिश्रण देखील चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे.
बेसन आणि तुळशीची पाने यांचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने चेहरा टवटवीत दिसतो.
हा तयार फेसपॅक २० मिनिटे चेहऱ्याला लावा आणि जेव्हा फेस पॅक कोरडा होतो तेव्हा चेहरा थंड पाण्याने धुवा.
तुळशीच्या पानांचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने थंडावा मिळतो व त्वचेवरील पुरळ देखील कमी होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.