Early signs of heart attack saam tv
लाईफस्टाईल

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Early signs of heart attack: आजकालच्या धावपळीच्या जीवनात हृदयाचे आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. हृदयविकार हा जगभरात मृत्यूचे एक प्रमुख कारण बनला आहे. अनेकदा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, पण त्याची लक्षणे सुरुवातीला स्पष्ट दिसत नाहीत.

Surabhi Jayashree Jagdish

  • हृदयविकाराची लक्षणे नेहमी छातीत दुखण्यापर्यंत मर्यादित नसतात.

  • छातीत दडपण किंवा जडपणा हृदयविकाराचे सामान्य लक्षण आहे.

  • मळमळ आणि अॅसिडिटी हृदयविकाराचे अस्पष्ट लक्षण असू शकतात.

आपल्यापैकी अनेकांचा असा समज असतो की, हृदयाच्या कोणत्याही समस्या असतील तर लगेच लक्षात येतं. अशावेळी सामान्यपणे छातीत वेदना होतात, धडधड वाढते आणि मग आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर सांगतात की, हृदयविकाराची लक्षणं अनेक वेळा स्पष्ट नसतात आणि ती नेहमी छातीतच जाणवत नाहीत.

विशेषतः जर तुमचं वय ५० वर्षांपेक्षा जास्त असेल तर लठ्ठपणा, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुमच्या हृदयाच्या नसा ब्लॉक होत असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्या. जेणेकरून तुम्हाला हृदयाच्या पुढच्या समस्या टाळता येतील. ही लक्षणं काय असतात जाणून घेऊया.

छातीत अस्वस्थता किंवा दडपण

हे हृदयविकाराचं सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. जर तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होत असतील किंवा तुम्हाला हृदयविकाराचा झटका येत असेल तर छातीत दडपण, जडपणा, दुखणं, जळजळ किंवा घट्ट वाटणं अशा संवेदना जाणवू शकतात. या वेदना थोड्या वेळासाठी राहत नाहीत तर त्याचा कालावधी बराच वेळ असतो.

मळमळ आणि अॅसिडिटी

हृदयविकाराचा झटका येत असताना काही लोकांना मळमळ, अपचन, किंवा अॅसिडिटीसारखं वाटू शकतं. काही जणांना उलट्याही होऊ शकतात. ही लक्षणं स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात. अशा प्रकारची लक्षणं गॅस किंवा अपचनामुळेही होऊ शकतात. मात्र असा त्रास झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

दुखणं हातापर्यंत पसरणं

छातीतून सुरुवात होऊन डाव्या हातापर्यंत जाणारं दुखणं हे हृदयविकाराचं लक्षण मानलं जातं. ही वेदना खांद्यापर्यंत तसंच हाताच्या अंगठ्यापर्यंत जाऊ शकतं. या वेदना अचानक होतात. त्यामुळे तुम्हाला जर हा त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे नक्की जा.

चक्कर येणं

भूक नसणं, पाणी कमी पिणं किंवा झपाट्याने उभं राहिलं तरी क्षणभर चक्कर येणं हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. जर अचानक चक्कर येत असेल आणि त्यासोबत छातीत दुखणं किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घशात किंवा जबड्यात वेदना

केवळ घसा किंवा जबड्यात दुखणं हृदयाशी संबंधित नसतं असे अनेकांना वाटतं. हे सर्दी, सायनस किंवा स्नायूंच्या ताणामुळे होऊ शकतं. पण जर छातीत दडपण जाणवत असेल आणि ती वेदना घशात किंवा जबड्यात पसरत असेल तर ते हृदयविकाराचं लक्षण असू शकतं.

हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण कोणते?

छातीत दडपण, जडपणा किंवा जळजळ हे हृदयविकाराचे सर्वात सामान्य लक्षण आहे.

हृदयविकाराची लक्षणे का अस्पष्ट असतात?

कारण ती मळमळ, अॅसिडिटी, चक्कर येणे यासारख्या सामान्य तक्रारींमध्ये दडलेली असतात.

हातापर्यंत पसरणारी वेदना का धोकादायक आहे?

कारण छातीतून सुरू होऊन डाव्या हाताकडे पसरणारी वेदना हृदयविकाराचे गंभीर लक्षण आहे.

स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे कशी वेगळी असतात?

स्त्रियांमध्ये मळमळ, अपचन, उलट्या आणि चक्कर येणे अशी लक्षणे अधिक सामान्य असतात.

घशात किंवा जबड्यात वेदना का गंभीर आहे?

जर छातीत दडपण असेल आणि ती वेदना घशात किंवा जबड्यात पसरत असेल, तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार त्रिग्रही राजयोग; शुक्र-सूर्य देवाच्या कृपेने काही राशींचं आयुष्य पालटणार

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

SCROLL FOR NEXT