High cholesterol SAAM TV
लाईफस्टाईल

High cholesterol: सकाळच्या या 4 सवयींमुळे नसांमध्ये जमा होतंय घाणेरडं कोलेस्ट्रॉल; आजच बदला जीवनशैली

LDL cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यास सुरुवातीला लक्षणं जाणवत नाहीत. मात्र LDL जास्त असल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नाश्ता टाळणे, तेलकट पदार्थ खाणे, तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अपुरी झोप यांसारख्या सवयींबाबत जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल अनेक लोकांना कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या जाणवते. कोलेस्ट्रॉल वाढलं तरी सुरुवातीला शरीरात कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपले कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, हे लगेच समजत नाही. मात्र कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यास हार्ट अटॅक आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढू शकतो.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वाचा आहे. पण त्यासोबत आपल्या रोजच्या छोट्या सवयींकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. सकाळी केलेल्या काही सवयींमुळे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढण्याचा धोका असू शकतो.

सकाळचा नाश्ता न करणं

अनेक लोक सकाळच्या घाईमुळे नाश्ता करत नाहीत. काही जण तर रोजच नाश्ता न करता घराबाहेर पडतात. ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. काही अभ्यासांमध्ये नाश्ता न करणाऱ्या लोकांमध्ये एकूण कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलंय. PubMed वर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सकाळी तेलकट पदार्थ खाणं

सकाळच्या नाश्त्यात तळलेले पदार्थ, पेस्ट्री, प्रक्रिया केलेले मांस किंवा बाहेरचे तेलकट पदार्थ खाणं टाळावं. या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट जास्त असू शकते. अशा प्रकारची चरबी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL वाढवू शकते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात वारंवार असे पदार्थ खाल्ल्यास हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

सकाळपासूनच तणावात राहणं

सकाळी उठल्यापासून कामाची घाई, ऑफिसची चिंता किंवा इतर कारणांमुळे जास्त तणाव घेतला तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. तणाव वाढला की शरीरात कॉर्टिसोल नावाचे हार्मोन जास्त प्रमाणात तयार होऊ शकते. यामुळे शरीरातील चरबीवर परिणाम होऊ शकतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.

सकाळी अजिबात हालचाल न करणं

सकाळी उठल्यानंतर अजिबात चालणं किंवा कोणतीही शारीरिक हालचाल न करणं हीदेखील चांगली सवय नाही. दिवसभर सतत बसून राहिल्यास त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. सकाळी थोडं चालणं, स्ट्रेचिंग करणं किंवा हलका व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढण्यास मदत होऊ शकते.

रात्री पुरेशी झोप न घेणं

आपल्या झोपेचा परिणामही कोलेस्ट्रॉलवर होऊ शकतो. रोज कमी झोप घेणं किंवा कधी लवकर तर कधी उशिरा झोपणं यामुळे शरीराची झोपेची वेळ बिघडते. याचा परिणाम शरीरातील अनेक गोष्टींवर होऊ शकतो. काही अभ्यासांमध्ये असे दिसून आलंय की, ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही किंवा ज्यांची झोपण्याची वेळ रोज बदलत असते, त्यांच्यात बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL जास्त असू शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

Maharashtra News Live Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत बैठक सुरू

Mangala Gauri Look: मंगळागौरीसाठी नऊवारी साडीवर ठुशी की वाटी मंगळसूत्र? कोणता दागिना सर्वात जास्त उठून दिसेल?

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT