Aja Ekadashi 2023 (10 September) Saam Tv
लाईफस्टाईल

Aja Ekadashi 2023 (10 September) : आज श्रावण महिन्यातील अजा एकादशी; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Aja Ekadashi : श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अजा एकादशीचे व्रत केले जाईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aja Ekadashi :

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला अजा एकादशीचे व्रत केले जाईल. हे व्रत रविवार, 10 सप्टेंबर 2023 रोजी पाळण्यात येणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या विशेष दिवशी भगवान विष्णूची पूजा करून उपवास करण्याचे भक्तासाठी विशेष महत्त्व आहे.

भगवान विष्णूची उपासना करण्यासाठी व्रत केल्यास वेदांचे ज्ञान व यज्ञविधी केल्याचे पुण्य प्राप्त होते, मोक्षप्राप्ती होते, चंद्राच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळते, मानसिक व शारीरिक स्थिती सुधारते, सुख, समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होते. एखाद्याला आशीर्वाद मिळतो. एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते, असेही मानले जाते.

शुभ मुहूर्त

श्रावण (Shravan) कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 09 सप्टेंबरपासून 07:17 वाजता सुरू होईल आणि 10 सप्टेंबर रोजी रात्री 09:28 वाजता समाप्त होईल. या दिवशी पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्र तयार होत आहे. पुनर्वसु नक्षत्र संध्याकाळी 05.06 पर्यंत राहील आणि त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरू होईल. या दिवशी रविपुष्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहेत. जे 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 05:06 ते 05:26 पर्यंत चालेल.

पूजा पद्धत

  • अजा एकादशी हा एक असा सण आहे ज्यामध्ये नियम आणि कर्मकांडाने व्रत केले जाते.

  • एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे.

  • पूजास्थान स्वच्छ करून भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा.

  • पूर्ण भक्तिभावाने व्रत पाळण्याची प्रतिज्ञा घ्या.

  • पुजेचे काही साहित्य जसे की फुले, नारळ (Coconut), सुपारी, फळे, लवंगा, अगरबत्ती, तूप, पंचामृत भोग, तेलाचा दिवा, तुळस, कडधान्ये, चंदन इ.

  • त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करून अन्नदान करा. सकाळ संध्याकाळ आरती करावी.

  • अजा एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते, म्हणून तिची व्रत कथा वाचा.

  • काही भक्त रात्रभर जागे राहून देवाला समर्पित भक्तिगीते, भजन आणि कीर्तने गातात.

  • द्वादशीच्या दिवशी सकाळी गरीब आणि ब्राह्मणांना भोजन करून दक्षिणा द्यावी.

  • यानंतर फळ म्हणत उपवास सोडावा.

महत्त्व काय?

एकादशीचे व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व प्रकारचे शारीरिक आणि मानसिक (Mental) त्रास दूर होतात. तसेच जर तुम्ही कर्जबाजारी असाल आणि आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर या एकादशीचे व्रत केल्यास समस्यांपासून मुक्ती मिळते. एकादशीच्या व्रताचा थेट परिणाम शरीर, मन आणि संपत्तीवर होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! डान्स अन् अभिनयाची आवड जोपासत केली UPSC क्रॅक; IPS श्रृती अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Wednesday Horoscope : दिवसभरात आर्थिक चणचण भासणार, प्रेमामध्ये अपयश मिळणार; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

Gajkesri Rajyog 2025: 22 जुलैला बनणार पॉवरफुल गजकेसरी राजयोग; 'या' ३ राशींना मिळणार पैसाच पैसा

Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

SCROLL FOR NEXT