सिंहगडच्या मावळ्यांची अनोखी क्रांती; साडेतीन हजार फुटांवर देशातील पहिला दरी झोका सागर आव्हाड
लाईफस्टाईल

सिंहगडच्या मावळ्यांची अनोखी क्रांती; साडेतीन हजार फुटांवर देशातील पहिला दरी झोका

शनिवारी रात्री एका झोक्यात लव्हु उघडे व दुसऱ्या झोक्यात तुषार दिघे या दोन तरुणांनी दरी झोक्यात मुक्काम केला. त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रात नवीन क्रांती केली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: सह्याद्रीच्या डोंगर रांगातील अतिविशाल अभेद्य सुळके, शिखरे पाहून अंगावर शहारे येतात. अशाच अतिदुर्गम तैल व बैल (ता.मुळशी) या दोन सुळक्याच्या कातळखडकात मध्यभागी झोका बांधून तेथे मुक्काम करण्याचे साहस मावळा जवान संघटनेच्या गिर्यारोहकांनी केले. या दोन तरुणांनी गिर्यारोहण क्षेत्रात नवीन क्रांती केली आहे. (The unique revolution of the Mavlas of Sinhagad; The first valley zoli in the country at three and a half thousand feet)

हे देखील पहा -

चोहोबाजूंनी उंच डोंगरकडे असलेल्या अद्भभुत विशालता व अत्यंत दुर्गम सुळके म्हणून तैल व बैला या सुळक्यांची ओळख आहे. तब्बल साडेतीन हजार फुट उंची असलेल्या या दोन सुळक्यांच्या मध्यभागी जवळपास ऐंशी फुट अंतर आहे. सुळक्यांच्या मध्यभागी खडकात बोल्ट बसवून त्याला दोरखंड बांधण्यात आले. त्याआधारे दोरखंडांला मध्यभागी झुलता कापडाचा झोका बांधण्यात आला. खोल दरीत थरारक झोक्याची छावणी उभारण्याचे अनोखे साहस सिंहगड येथील मावळा जवान संघटनेचे गिर्यारोहक लव्हु उघडे यांनी केले.

शनिवारी सकाळी तैलबैला गावातून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मोहिमेला सुरुवात केली. साडेतीन तासांचा खडतर प्रवास करत सर्वजण सुळक्यावर दाखल झाले. सुळक्यावर चढाईसाठी बसविण्यात आलेल्या खडकातील बोल्टमध्ये झोक्याचे दोरखंड बांधण्यात आले. त्यावर दोन झुलते झोके बांधण्यात आले. शनिवारी रात्री एका झोक्यात लव्हु उघडे व दुसऱ्या झोक्यात तुषार दिघे अशा दोघांनी मुक्काम केला. खाली अडीच हजार फुट खोल दरी, रक्त गोठवणारे थंडगार वारे आणि निसर्गाच्या अद्दभुत सानिध्यात दोघा तरुणांनी जिवाची पर्वा न करता मुक्काम केला. काल रविवारी सकाळी दोघेही झोक्यातुन खाली उतरले. अतिविशाल सुळक्यावर झुलता झोका उभारण्याची हा देशातील पहिलीच घटना आहे.

लव्हु उघडे म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची अतिदुर्गम शिखरे, सुळके सर करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होतो. तैल व बैल सुळक्यांच्या मध्यभागी झुलता झोका बांधून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. निसर्गाची अद्भभुत किमया म्हणून ओळख असलेल्या मुळशी तालुक्यातील अति दुर्गम तैल व बैल सुळक्याच्या मध्यभागी दोरखंडाने बांधलेला झुलता झोका. झोक्यात सिंहगडाच्या साहसी तरुणांनी मुक्काम करून गिर्यारोहण क्षेत्रात नवीन क्रांती केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT