नवी मुंबई : खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेची सुरुवात झाली व पनवेल येथे संध्याकाळी या यात्रेची सांगता करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करुन सरकारला कोर्टामध्ये सकारात्मक भुमिका माडंण्यासाठी जागे करण्यात येणार आहे.
हे देखील पहा :
राज्य सरकार मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही त्यामुळे आम्ही मुंबई मध्ये लॉंग मोर्चा काढणार असल्याची माहिती छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मराठा आरक्षणाचे जे टप्पे आहेत त्यांनी ते पूर्ण करावेत असेही संभाजीराजे म्हणाले.
राज्य सरकारी मागासवर्गीय आयोग स्थापन करावा जे काही आहे ते सर्व सरकारसमोर आमच्या मागण्या आहेत त्यामुळे सरकारने त्याचा विचार करणे आवश्यक आहे. मराठा समाजाकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.