Blood Vein Color saam tv
लाईफस्टाईल

Blood Vein Color: रक्ताचा रंग लाल, मग नसा का हिरव्या-निळ्या दिसतात? जाणून घ्या यामागील विज्ञान

Why Veins Look Blue Green: तुमच्या लक्षात आलंय का की, आपल्या रक्तवाहिन्या अनेकदा निळ्या किंवा हिरव्या दिसतात. पण रक्ताचा रंग लाल असतो. आज आपण यामागील विज्ञान समजून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपली त्वचा नीट निरखून पाहिली तर आपल्याला शरीरातील नसा दिसू लागतात. या नसा निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या असतात. मात्र तुमच्या मनात कधी प्रश्न आलाय का की, जर रक्ताचा रंग लाल आहे तर रक्तवाहिन्या हिरव्या किंवा निळ्या कशा दिसतात. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.

रक्ताचा रंग लाल का असतो?

आपल्या रक्तात हिमोग्लोबिन नावाचे एक प्रोटीन असतं. हे शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं. ज्यावेळी हे हिमोग्लोबिन ऑक्सिजनसोबत एकत्र येतं तेव्हा ते लाल होतं.

आपल्या शिरा निळ्या का दिसतात?

हा एक भ्रम आहे जो आपल्या डोळ्यांच्या आणि मेंदूच्या संयुक्त युक्तीचा परिणाम मानला जातो. खरं तर शिरा निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या नसतात. त्या आपल्याला तशा दिसतात.

विजुअल ट्रिक करते काम

एका आर्टिकलनुसार, ही एक विजुअल ट्रिक आहे. आपले डोळे आणि मेंदू एकत्रितपणे आपल्याला दाखवणारे रंग हे खरे असतीलच असे नाही. नसांच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारा प्रकाश आणि त्वचेखालील पोत एकत्रितपणे एक भ्रम निर्माण करतात. यामुळेच ज्यामुळे त्या निळ्या दिसतात.

ऑक्सिजनची मात्रा

अनेकांना असं वाटतं की, ऑक्सिजनमुळे रक्तवाहिन्यांचा रंग निळा असतो. मात्र हे खरं नाही. ऑक्सिजनमुक्त रक्ताचा रंग देखील गडद लाल असतो. म्हणून निळा दिसणे हे केवळ प्रकाश आणि त्वचेच्या पोताचा परिणाम आहे, रक्ताच्या रंगाचा नाही.

त्वचेचा रंग आणि नसांमधील फरक

गोरी त्वचा असलेल्या लोकांमध्ये शिरा बहुतेकदा अधिक स्पष्ट आणि निळ्या/हिरव्या दिसू लागतात. तर गडद त्वचेमध्ये हा फरक कमी प्रमाणात लक्षात येतो. त्वचेची जाडी, रंग आणि नसांची खोली या सर्व गोष्टी तुम्हाला शिरा कोणत्या रंगाच्या दिसतील हे ठरवतात.

प्रत्येकाला नसा सारख्या दिसत नाहीत

आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्येक माणसाचे डोळे रंगाबाबत सारखेच संवेदनशील नसतात. त्यामुळे काहींना या शिरा किंचित हिरव्या, काहींना निळ्या आणि काहींना राखाडी दिसू शकतात.

Source: Cleveland Clinic

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT