केरसुणी बनवणाऱ्या कुंचिकोरवे समाजातील लोकांची व्यथा... दिलीप कांबळे
लाईफस्टाईल

केरसुणी बनवणाऱ्या कुंचिकोरवे समाजातील लोकांची व्यथा...

शिंदाड या वनस्पतीची कमतरता झाल्याने हा व्यवसाय धोक्यात आला आहे. केरसुणी बनवणाऱ्या कुंचिकोरवे समाजातील (Kunchikorve Samaj) लोकांची जगण्यासाठी धडपड सुरु आहे.

दिलीप कांबळे

मावळ, पुणे: दिवाळी (diwali) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी (Laxmi Pujan) केरसुणी बनविण्याची लगबग कारागिरांकडून सुरु आहे. मात्र केरसुणी बनवण्यासाठी लागणारी शिंदाड या वनस्पतीची कमतरता निर्माण झाल्याने केरसुणीचा व्यवसाय धोक्यात आला आहे. केरसुणी बनवणाऱ्या कुंचिकोरवे समाजातील (Kunchikorve Samaj) लोकांची जगण्यासाठी धडपड सुरु आहे. (The plight of the people of Kunchikorve community who make kersuni)

हे देखील पहा -

आमचं हातावरचं पोट... दिवाळी आली की लक्ष्मी अर्थात केरसुणी विकायची आणि येईल त्या कमाईतून पोराबाळांना कपडे घ्यायचे. दिवसभर उन्हा-तान्हात बसल्यावर हाती तीन-चारशे रुपये येतात. पण त्यासाठी घरच्या लक्ष्मीलाच लक्ष्मी विकायला घराबाहेर पडावं लागतं. तेव्हा कुठं आमची दिवाळी साजरी होते. ही व्यथा आहे मावळ मधील लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी विक्री करणाऱ्या कारागिरांची.  

दिवाळीत लक्ष्मीची विक्री मोठ्या प्रमाणात होते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, सोलापूर येथून लक्ष्मी बनवण्यासाठी कच्चा माल येतो. लक्ष्मी विकून मिळेल त्या रोजगारावर दिवाळी साजरी करायची म्हणून सध्या मावळमधील देहुरोड येथील कुंचिकोरवे समाजाची (Kunchikorve society) लगबग सुरु झाली आहे. शिंदोळ्याच्या पाना-फडापासून केरसुणी बनवली जाते. तीन महिन्यांपासून याची तयारी केली जाते. पिढ्यान्‌पिढ्यांचा हा व्यवसाय आहे. दिवाळीत केरसुणीला मोठा मान असतो. त्यामुळे तिच्या विक्रीच्या कमाईतूनच कुंचिकोरवे समाजातील लोकांचं दिवाळीतील लक्ष्मीपूजन साजरं होतं. मात्र लक्ष्मी कमविण्यासाठी दिवसभर घाम गाळावा लागतो.

सणावारालाही लोक लक्ष्मीचा भाव करतात, त्यावेळी वाईट वाटतं. मिळेल त्या नफ्यातून आमच्या लोकांची आणि पोरा-बाळांची दिवाळी साजरी होते.
राकेश कुंचिकोर, कारागिर

महाराष्ट्रात केरसुणी बनविणे परंपरा आहे. मात्र शिंदाडचे झाडे संकटात सापडली आहेत. शिंदाड वनस्पतीचे पाने मिळवण्यासाठी या लोकांना भटकंती करावी लागते. काही शेतकर्‍यांच्या शेतीलगत शिंदाड झाडे आहे. त्या ठिकाणी ते पाने विकत घेण्याची वेळ करागिरावर आली आहे. एक केरसुणी बनविण्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागते. पाने सुखवताना हातात काटे घुसतात, तर झाडू बनविण्यासाठी परिवारातील सर्वच कामाला लागतात. यांची सकाळी पहाटे पासून सुरूवात होते तर, थेट रात्रीपर्यंत चूल-मूल सांभाळून महिलांना ही कसरत करावी लागते. 

केरसुणी बनविण्यासाठी लागणार्‍या शिंदाड वनस्पतीचे पाने गोळा करणे, ती पाने उन्हामध्ये वाळविली जातात त्यानंतर त्यांची सफाई करणे आदी गोष्टी या व्यावसायिकांना कराव्या लागतात. मागील पाच वर्षांपूर्वी शिंदाड ही वनस्पती ओढे, नाले, तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात आढळत होती. मात्र, सध्या ठराविक ठिकाण वगळता ही वनस्पती मिळत नाही. त्यामुळे कारागिरांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

दिवाळीचा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि दिवाळी म्हटलं की झाडू, केरसुनी यांची पूजा पारंपारिक पद्धतीने केली जाते. मावळमधील देहूरोड येथे सर्व कुंचिकोरवे समाज केरसुणी झाडू तयार करण्यात मग्न आहे. सकाळपासून शेताच्या बांधावर जाउन पाने घेऊन आल्यानंतर सुंदर सुबक झाडू बनवणे असा यांचा हा व्यवसाय. मात्र कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्षे यांचा व्यवसाय बंद होता. आता कुठेतरी व्यवसाय सुरू झालाय, मात्र योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा केली जाते. दिवाळीच्या तोंडावर केरसुणी विकत घेतली जाते. मात्र फ्लॅट संस्कृती आली तशी केरसुणीची जागा फुलझाडूने घेतली आणि केरसुणी तयार करणाऱ्या कुंचिकोरवे महिलांच्या घरातील लक्ष्मीचा ओघ मात्र आटला. हे तितकंच सत्य आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटेना, केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करणार, एकनाथ शिंदेंना २ ऑफर?

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra News : केंद्राचं महाराष्ट्राला गिफ्ट, २ रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT