Super Buck moon, Gurupornima ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

गुरुपौर्णिमेला चंद्र येईल पृथ्वीच्या अगदी जवळ, आकाशात दिसेल आज सर्वात मोठा सुपरमून

गुरुपौर्णिमेला दिसेल पुन्हा सुपरमून.

कोमल दामुद्रे

मुंबई : गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या पौर्णिमेला यंदा पुन्हा सुपरमून दिसेल. या वेळी चंद्राची कक्षा त्याला नेहमीपेक्षा पृथ्वीच्या अधिक जवळ आणेल. या खगोलीय परिस्थितीला सुपरमून असे म्हटले जाते.

हे देखील पहा -

सुपरमून हा खगोलीय परिस्थितीच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असतो. या वेळी हवामान अनुकूल असून चंद्र अधिक चमकत असून तो अधिक मोठा दिसू लागतो. आज आलेल्या पौर्णिमेला बक मून असे नाव देण्यात येईल. हे असे वर्षाच्या त्या वेळेच्या संदर्भात नमूद केले आहे जेव्हा हरणाला नवीन शिंगे येत असतात.

१४ जून ला दिसलेला सुपरमून हा स्ट्रॉबेरी मून म्हणून ओळखला गेला. या दिवशी अमेरिकेन लोकांच्या मते वसंत महिन्यात येणारी शेवटची पौर्णिमा व उन्हाळ्यात येणारी पहिली पौर्णिमाच्या रुपाने ओळखले जाते. सुपरमूनच्या वेळी पृथ्वी आणि चंद्राच्या मधील अंतर हे कमी होत जाते. चंद्र या वेळी पृथ्वीच्या फक्त ३५७,२६४ किलोमीटर असतो. यावेळी सुपरमूनचा प्रभाव हा समुद्रावर देखील पडतो. सुपरमूनमुळे आपल्याला उंच आणि सखल भागी समुद्राला भरती येऊ शकते.

सुपरमून आज रात्री २ वाजून ३८ मिनिटांनी EDT (12.08 am IST, गुरुवार) या दिवशी दिसेल. नासा चे असे मत आहे की, हा सुपरमून गुरुवारी सकाळी भारतात (India) दिसेल. तसेच मंगळवारच्या सकाळपासून ते शुक्रवारच्या सकाळपर्यंत संपूर्ण तीन दिवस हा चंद्र दिसेल.

सुपरमून या शब्दाला १९७९ मध्ये रिचर्ड नोल नावाच्या ज्योतिष्याने सांगितली होते. त्यानंतर याला अमेरिकाच्या अंतराळ एजन्सी नासाने याला स्विकारले. अंतराळ एजन्सीचे असे म्हणणे आहे की, या घटनेला पौर्णिमा असे म्हटले आहे. या दिवशी चंद्राला बघण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. याला स्कायवॉचर्स व फोटोग्राफर आपल्या कॅमेऱ्यामध्ये (Camera) त्याचे फोटो टिपतात. सुपरमून हा वर्षातून तीन ते चार वेळा दिसतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT