Adhik Maas 2026 saam tv
लाईफस्टाईल

Adhik Maas 2026: हिंदू नववर्ष 2083 मध्ये 12 नव्हे तर असणार 13 महिने; जाणून घ्या यागामचं धार्मिक कारण

Hindu New Year 2083 13 months: हिंदू पंचांगानुसार २०८३ हे नववर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षी १२ ऐवजी १३ महिने असतील. यामागे धार्मिक आणि खगोलशास्त्रीय कारण आहे.

Surabhi Jayashree Jagdish

इंग्रजी कॅलेंडरनुसार, नव्या वर्षाला सुरुवात झालीये. मात्र हिंदू पंचांगानुसार, त्याचा काळ विक्रम संवत आहे. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला होणार असल्याचं मानलं जातं. येणारा विक्रम संवत 2083 हा खास मानला जाणार आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी अधिक मास लागणार आहे. यामुळे यावर्षी १२ नाही तर १३ महिने असणार आहेत.

विक्रम संवत 2083 कधीपासून होणार सुरु?

विक्रम संवत 2083 ची सुरुवात १९ मार्च २०२६ मध्ये होणार आहे. यादिवशी गुढी पाडव्याचा सण असणार आहे. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रालाही सुरुवात होणार आहे.

जेष्ठ महिन्यात लागणार अधिक मास

यावर्षी जेष्ठ महिन्यात अधिक मास लागणार असून १७ मे २०२६ पासून याची सुरुवात होणार आहे. हा अधिक मास १५ जून २०२६ पर्यंत असणार आहे. यामुळे अनेक उपवास आणि सण अंदाजे १५ ते २० दिवसांनी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

१३ महिन्याचं वर्ष ठरणार दुर्मिळ

अधिक मासमुळे हे हिंदू नववर्ष १३ महिन्यांचं असणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान विष्णूने या अतिरिक्त महिन्याला त्याचं नाव दिलंय. म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा सर्व महिन्यांत सर्वात पवित्र मानला जातो. अधिक मासला मल मास, अधिक मास आणि पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. असं मानण्यात येतं की, हा काळ भक्ती, आध्यात्मिक साधना आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वात शुभ असतो.

अधिक मासचं पौराणिक महत्त्व

हिंदू पौराणिक कथेनुसार, जेव्हा अधिक मास पहिल्यांदा आला तेव्हा कोणताही देव तो स्वीकारण्यास तयार नव्हता. त्यानंतर भगवान विष्णूने तो त्यांच्या संरक्षणाखाली घेतला आणि त्याचं नाव पुरुषोत्तम मास ठेवलं. तेव्हापासून हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो.

असं मानण्यात येतं की, या काळात केलेली पूजा, जप, तपस्या आणि दान यामुळे आनंद, शांती आणि पुण्य मिळते. पंचांगानुसार, १७ मे ते १५ जून २०२६ हा संपूर्ण काळ आध्यात्मिक साधना, मंत्र जप, ध्यान आणि दान यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्याच्या पहिल्या दिवशी उपवास केल्याने पापे शुद्ध होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

शुभ कार्यांवर बंदी

धार्मिक ग्रंथांनुसार, अधिक मास दरम्यान लग्न, गृहप्रवेश, मुंडन समारंभ, नामकरण समारंभ, भूमिपूजन समारंभ किंवा नवीन व्यवसाय सुरू करणं अशुभ मानण्यात येतं. असं मानलं जातं की, या काळात ग्रहांची स्थिती अनुकूल नसते आणि म्हणूनच अशा कामांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.

अधिक मास का पाळला जातो?

खरंतर सौर वर्ष आणि चांद्र वर्षाच्या कालावधीत फरक असतो. सौर वर्ष ३६५ दिवसांचं असतं. तर चंद्र वर्ष अंदाजे ३५४-३५५ दिवसांचं असतं. कालांतराने हा फरक वाढत जातो आणि अंदाजे ३२ महिने आणि १६ दिवसांनी तो समतोल राखणं आवश्यक होतं. हे संतुलन साधण्यासाठी कॅलेंडरमध्ये अधिक मास नावाचा एक अतिरिक्त महिना जोडला जातो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रवींद्र चव्हाण पडले मौलवींचे पाया? मौलवी भाजपच्या सभेत?

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

Maharashtra Live News Update : विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे

स्वकीयांकडून महाराष्ट्राचा घात; राज ठाकरेंचा अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून CM फडणवीसांना टोला

माजी उपराष्ट्रपतींची तब्येत बिघडली; दोन वेळा बेशुद्ध झाल्यानंतर थेट AIIMS मध्ये दाखल

SCROLL FOR NEXT