Dussehra auspicious yog saam tv
लाईफस्टाईल

Dussehra auspicious yog: विजयादशमीचा शुभ दिवस! या ४ राशींवर ‘शुभ योगांचा’ वर्षाव, आयुष्यात येणार मोठा बदल

Dussehra auspicious yogas and luck: असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यंदाच्या विजयादशमीला ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे अनेक 'शुभ योगांची' निर्मिती होत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज २ ऑक्टोबर २०२५ म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. आजचा दिवस धार्मिक आणि राष्ट्रीयदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून आज विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय साजरा केला जातो.

पंचांगानुसार, आज रवियोग आणि सर्वार्थसिद्धि योग यांसारखे काही विशेष शुभ योग तयार होणार आहेत. ज्यामुळे नवीन कार्य, धार्मिक उपक्रम, यात्रा, व्यवसायातील निर्णय किंवा वैयक्तिक महत्त्वाची पावलं उचलण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानण्यात येतो. सूर्य कन्या राशीत आणि चंद्र मकर राशीत भ्रमण करत आहे.

ग्रहांच्या काही राशींवर विशेष अनुकूल प्रभाव दिसून येत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचं सविस्तर पंचांग, शुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे.

पंचांग माहिती

  • तारीख: २ ऑक्टोबर २०२५, गुरुवार

  • तिथी: आश्विन शुक्ल दशमी (विजयादशमी)

  • वार: गुरुवार

  • नक्षत्र: उत्तराषाढा नक्षत्र दुपारीपर्यंत, त्यानंतर श्रवण नक्षत्र

  • योग: रवियोग, सर्वार्थसिद्धि योग

  • चंद्र राशी: मकर

  • सूर्य राशी: कन्या

  • सूर्योदय: सकाळी ६:२१

  • सूर्यास्त: सायंकाळी ६:०९

शुभ मुहूर्त आणि राहुकाल

  • अभिजित मुहूर्त: सकाळी ११:४७ ते १२:३४ – कोणत्याही शुभ कार्यासाठी अनुकूल वेळ

  • गुलिक काल: सकाळी ८:३० ते १०:००

  • राहुकाल: दुपारी १:३० ते ३:०० — या काळात शुभ कार्य टाळावीत

  • ब्राह्म मुहूर्त: सकाळी ४:४७ ते ५:३५

  • दुर्मुहूर्त: सकाळी ८:४४ ते ९:३२ आणि रात्री ११:०४ ते ११:५३

  • वर्ज्य काल: संध्याकाळी ५:४० ते ७:२०

आजचा दिवस लाभदायक असलेल्या चार राशी

वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस विशेष लाभदायक ठरणार आहे. आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये कोणतीही कामं अडकलेली असतील तर ती पूर्ण होणार आहेत. कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे.

सिंह राशी

सिंह राशीच्या व्यक्तींना आज आत्मविश्वासात वाढ होणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची चिन्हं दिसतायत. आज तुम्हाला नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळणार आहे.

धनु राशी

धनु राशीसाठी आजचा दिवस करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती घडवणार आहे. नोकरीत तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. जुने आणि प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्ही योग्य निर्णय घ्याल

मीन राशी

मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मानसिक समाधान आणि प्रगतीचा आहे. घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण राहणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होणार आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Massage Parlour Fraud : मसाजाच्या हौसेने वकिलाचे खाते झालं रिकामं, नग्न अवस्थेत व्हिडिओ काढून लुबाडलं, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

Pune : पुण्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांना अटक, खंडणी प्रकरणात मोठी कारवाई

Ranapati Shivray Swari Agra: 'रणपति शिवराय- स्वारी आग्रा'; शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Chanakya Niti: नवरा-बायकोने या ३ गोष्टी लक्षात ठेवा, संसार होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT