World Teacher's Day 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

World Teacher's Day 2023 : शिक्षक असावा तर असा! भजनातून मुलांना शिकवली अ, आ, इ...; VIDEO बघून सॅल्यूट ठोकाल!

International Teacher's Day 2023 : गुरु हा माणसाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा असतो. याच गुरूंच्या सन्मान करण्यासाठी दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो.

Shraddha Thik

World Teacher's Day :

गुरु हा माणसाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारा असतो. याच गुरूंच्या सन्मान करण्यासाठी दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा केला जातो. तसेच भारतात 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो.

जागतिक शिक्षक दिन हा 5 ऑक्टोबर 1966 रोजी पॅरिस मध्ये एक परिषद आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये युनेस्कोने शिक्षकांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर शिफारस मांडण्यात आल्या. तब्बल 28 वर्षानंतर हे मुद्दे स्वीकारले आणि या दिवसाच्या स्मरणार्थ 1994 पासून जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा (Celebrate) केला जातो.

प्रत्येक पिढीनुसार आपल्या शिक्षण क्षेत्रात नवीन बदल दिसून आले आहेत. तसेच या नव्या पिढीसाठी आजकाल बऱ्याच अ‍ॅक्टिव्हिटीज करून शिक्षणावर अधिक भर दिला जातोय. सध्या अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी शिक्षक (Teacher) नवनवीन अ‍ॅक्टिव्हिटीज शाळेत करत असतात. नुसता रट्टा वाचनाने कोणत्याही अडचणींवर मात देता येत नाही. त्यांमुळे भविष्यातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी मुलांना वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज करून समजावले जाते.

रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. तसाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. आनंद यादव भोजा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक शिक्षक मुलांना हिंदी वर्णमाला एका अनोख्या पद्धतीने शिकवताना दिसतात.

हा शिक्षक अ, आ, इ, ई या हिंदी वर्णमालेचे एक भजन बनवून शिकवत आहे. ही अप्रतिम शिकवण्याची पद्धत पाहून तुम्हीही शिक्षकांचे चाहते व्हाल. दरम्यान हा व्हिडिओ नेमका कोणत्या शाळेचा आणि ठिकाणाचा आहे अद्याप याची माहिती नाही. परंतु या शिकवणीच्या अनोख्या पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर भीषण आग पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT