Immunity boosting tea recipes  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

चहा प्रेमींनो, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या चहाचे सेवन करा

या पध्दतीने बनवा चहा वाढेल प्रतिकारशक्ती

कोमल दामुद्रे

मुंबई : सकाळी उठल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी दिवसाची सुरुवात ही आपण चहाने करतो. सकाळचा चहा प्यायल्याने आपल्याला ऊर्जा मिळते.

हे देखील पहा -

चहा प्रेमींसाठी चहा पिण्यासाठी कोणताही वेळ नसते. कोणत्याही क्षणी ते चहा पिऊ शकतात. टपरीवरच्या चहापासून ते एखाद्या प्रशस्त हॉटेलमध्ये चहाची चव वेगवेगळी असते. हल्ली जाहिरातीमध्ये देखील चहात अगदी कोणकोणते पदार्थ घातले आहे हे सांगितले जाते. सध्या पावसाळा सुरु झाल्यापासून सर्दी,ताप व काही साथीचे रोग होण्याची अधिक शक्यता असते अशावेळी आपण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या चहाचे सेवन करा.

१. तुळशीला औषधांची राणी म्हटले जाते. आपल्याला होणाऱ्या विविध संक्रमणापासून तुळशी आपला बचाव करते. रक्तातील साखरेची पातळी देखील कमी करते. आले शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म हाडांचे आरोग्य सुधारतात, रक्तातील साखर कमी करतात आणि संक्रमणाशी लढतात. यासाठी आपण आले व तुळशीचा चहा बनवून पिऊ शकतो.

२. गूळ लोह, खनिजे आणि अनेक आवश्यक पोषक तत्वांनी भरलेला असतो. गुळाचा चहा पचनासाठीही फायदेशीर असू शकतो. गूळ रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करतो. गुळाचा चहा पिण्यासाठी आपण त्यात वेलची, काळी मिरी, बडीशेप, किसलेले आले, चहाची पाने व गुळ घालून तो बनवू शकतो.

३. मसाला चहामध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्व (Vitamins) ब व क, कॅरोटीन आणि मॅग्नेशियम असते. मसालेदार (Spices) चहा प्यायल्याने आपल्याला खोकला, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि शरीरदुखीपासून आराम मिळू शकतो. हे संक्रमण आणि जळजळ विरुद्ध लढण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. हे बनवण्यासाठी आपण हिरवी वेलची, लवंग, दालचिनी, काळी मिरी, बडीशेप, आले व चहाची पाने घालून बनवू शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Maval Heavy Rain : मुसळधार पावसाचा तडाखा; मावळ झाले जलमय, अनेक गावांचा संपर्क तुटला

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन नव्या मेट्रो स्थानकाला सरकारने दिली मंजुरी, वाचा सविस्तर

Reducing sweets: जगभरात 250 कोटी लोकं 'या' गंभीर आजाराशी झुंजतायत; आहारातील गोड कमी करणं ठरेल उपाय, WHO चा इशारा

Dance Viral Video : लुक लुक डोळे अन् मोतुले कान; 'बाप्पा येणार येणार' गाण्यावर चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स

SCROLL FOR NEXT