Tata Nexon Saam Tv
लाईफस्टाईल

Tata Nexon Facelift: टाटाची 'धाकड' कार येतेय; किंमत किती असेल? कशी असेल डीझाइन आणि फीचर्स?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tata Nexon Facelift 2023

टाटा मोटर्स हे वाहनांच्या उत्पादनात नावाजलेले नाव आहे. टाटाची टाटा नेक्सॉन ही नवीन कार नुकतीच बाजारात आली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, १४ सप्टेंबर रोजी कारच्या किमती जाहीर केल्या जातील. या कारचे बुकींग ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तुम्हीही टाटा नेक्सॉन घ्यायचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला कारच्या अॅडव्हान्स फिचर्सबद्दल सांगणार आहोत.

फीचर्स आणि डिझाइन

नेक्सॉन कारच्या केबिनला नवे डिझाइन देण्यात आहे. या डिझाइनला डॅशबोर्ड लेआउटसह नवीन रुप देण्यात आले आहे. यामध्ये ३ रंग उपलब्ध असतील. वरच्या बाजूस काळा रंग देण्यात आला आहे. तर दुसऱ्या भागात राखाडी रंग दिला आहे. डॅशबोर्डच्या खालच्या अर्ध्या बाजूस सॉफ्ट मटेरिअल आहे. जे इंडिगो रंगाच्या शेडमध्ये असेल.

स्मार्ट, स्मार्ट +, प्युअर, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह+फियरलेस या व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. स्टेयरिंग व्हीलच्या समोर पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कलस्टरला डिस्प्ले स्क्रिन मिळेल. तर इन्फोटेनमेंट सिस्टीमचा आकारदेखील वाढवण्यात आला आहे. तो आता १०.५ इंच आहे. एअरकॉन पॅनल हे टच बेस्ड युनिट आहे. सेंटर कन्सोलमध्ये वायरलेस चार्जिंग पॅडदेखील आहे. विशेष म्हणजे, कारमध्ये हवेशीर सीट ड्राइव्ह आणि अॅडजस्टेबल पॅसेंजर सीट आसतील.

डिझाइन

टाटा नेक्सॉन फेसलिफ्टला जाड अप्पर ग्रिल सेक्शनसह स्प्लिट-हेडलैंप सेट-अप आहे. ज्यामध्ये टाटा मोटर्सचा लोगो आहे. हेडलाइट्सचा खालचा भाग ट्रॅपेझॉइडल हाउसिंगमध्ये ठेवलेला आहे. ज्यामध्ये जाड प्लॅस्टिकची पट्टी आहे. Nexon ला नवीन LED डेटाइम रनिंग लाईट सिग्नेचर देखील मिळतात.

इंजिन

नेक्सॉन फेसलिफ्ट 120hp, 170Nm, 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह सुरू राहील. जे आता चार गिअरबॉक्सेससह उपलब्ध आहे - 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड AMT आणि 7. दुसरीकडे, 115hp, 160Nm, 1.5-लिटर डिझेल एकतर 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड AMT शी जोडलेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT