Tata Safari 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Tata Safari 2023: लाडकी सफारी आली नवीन रुपात; आधुनिक फिचर्ससह जबरदस्त लूक; बुकिंग सुरु

Tata Safari And Harrier : टाटा मोटर्सने सफारी आणि हॅरियरचे बुकिंग सुरु केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tata Safari And Harrier Features :

टाटा मोटर्स हे वाहन उत्पादन कंपन्यामधील मोठे नाव आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार बाजारात लाँच करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वी एसयूव्ही हॅरियर आणि सफारी लाँच केली होती. आता या कारचे बुकींग सुरु झाले आहे.

कारच्या बुकिंगसाठी २५ हजार आगाऊ रक्कम भरावी लागेल. ग्राहक कंपनीच्या जवळच्या डिलरशिपला भेट देऊन कार बुक करु शकतात. याचसोबत घरबसल्या ऑनलाईन कारची बुकींग करु शकतात. कंपनीने यासंबंधित एक्स प्लॅटफॉर्मवर टीझर जारी केले आहे. यात नवीन एसयूव्हीची झलक दाखवण्यात आली आहे.

1. इंजिन

एसयूव्ही हॅरियर आणि सफारीमध्ये 2.0 लीटर आणि 4-सिलेंडर टर्बो इंजिन असेल. हे इंजिन 170ps पॉवर आउटपुट आणि 350Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. हे इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ATशी जोडले गेले आहे. टाटाच्या या नवीन कारमध्ये डिझेल पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. तर हॅरियरमध्ये नवीन इलेक्ट्रिक प्रकार आहे.

2. इंटेरियर अपडेट्स

टीझरमध्ये कारसबंधित नवीन अपडेट्स दिले आहेत. कारमध्ये 10.25 इंचाचा फुल डिजिटल इंन्स्ट्रुमेंट कन्सोल, टाटाचा लोगो असलेला नवीन 4-स्पोक स्टेयरिंग व्हील, डॅशबोर्डवर एंट्री अॅम्बियंट लायटिंग देण्यात आली आहे. कारमध्ये वायरलेस वायर Apple CarPlay आणि AndroidAuto इंटरफेससह 12.3 इंच फ्लोटिंग टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टीम उपलब्ध आहे.

3. इन्स्ट्रुमेंट कन्सोल

कारमध्ये नेक्सॉन फेसलिफ्टसारखे ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. यामध्ये, 12.3 इंचाचे मोठे युनिट मिळू शकते.

4. प्रिमियम अपडेट्स

टाटा हॅरियर आणि सफारीमधील डॅशबोर्ड लेआउट हे आधीप्रमाणेच असेल. यामध्ये नवीन काचेचे पॅनेलदेखील दिले आहे. यात प्रिमियम लेदर फिनिश मिळेल.

5. सेंटर कन्सोल

टाटा नेक्सॉन आणि नेक्सॉन ईलेक्ट्रीक सारखे सेंटर कन्सोल आणि टॉगल स्विचसह टच बेस्ड हवामान कंट्रोल या कारमध्ये असेल. या नवीन सेंटर कन्सोलसह रोटरी ड्राइव सिलेक्टर आणि नवीन गियर आहे.

5. लूक

दोन्ही कारमध्ये समोरील बाजूस नवीन अपडेट्स दिले आहेत. यामुळे कारला चांगला लूक मिळाला आहे. वाइड फ्रंट एंडमध्ये ग्रिल सेक्शन, स्प्लिट एलईडी हेडलॅम्प क्लस्टर आणि पातळ लायटिंग बार, मस्क्यूलर बोनेट, नवीन डिझाइनसह अॅलॉय व्हील असे नवीन फीचर्स देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT