how to make morning breakfast, Tasty and healthy breakfast, morning breakfast Recipes, morning breakfast Ideas
how to make morning breakfast, Tasty and healthy breakfast, morning breakfast Recipes, morning breakfast Ideas ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

सकाळच्या नाश्त्यासाठी हा आहे योग्य पर्याय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बऱ्याचदा सकाळी नाश्ता काय करावा हा प्रश्न घरातील गृहिणींना पडतो. नाश्त्याचा विचार करताना आपण अनेकदा दूध (Milk), चहा, ज्युस किंवा ब्रेड इत्यादींना प्राधान्य देतो. सामान्यतः हाच नाश्ता दररोज घरांमध्ये दिला जातो. (Morning breakfast Recipes in Marathi)

हे देखील पहा -

दिवसाच्या सुरुवातीला आपण नाश्त्यामुळे द्विधा मन:स्थितीत अडकतो. त्यामुळे आज काय बनवायचे हा प्रश्न सतत पडत असतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना चाट खायला आवडते पण हा चाट आपण सकाळी बनवून दिवसाची सुरुवात केली तर घरातील सगळ्या सदस्यांना आवडते. त्यासाठी आपण चाट रेसिपी बनवणार आहोत.

पोहे चाट

नाश्त्यात पोहे हे पचण्यास हलके असतात व शरीरासाठी देखील खूप चांगले मानले जाते. त्याच्या मदतीने आपण आज चाट बनवणार आहोत.

साहित्य-

तेल (Oil) - २ चमचे

जाड पोहे - २ कप

बारीक चिरलेला कांदा - अर्धा कप

बारीक चिरलेला टोमॅटो - अर्धा कप

चिरलेली काकडी - २ चमचे

किसलेले गाजर - अर्धा कप

हिरवी चटणी - १ चमचा

चिंचेची चटणी - १ चमचा

मिरची पावडर - १ मोठा चमचा

जिरे पावडर - १ मोठा चमचा

चाट मसाला - १ मोठा चमचा

बारीक चिरलेला कोथिंबीर - २ चमचे

अर्धा लिंबू

आवश्यकतेनुसार बारीक शेव

कृती -

प्रथम कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात पोहे घाला. पोहे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर चाट बनवण्यासाठी एका भांड्यात कांदा, टोमॅटो, काकडी आणि गाजर घ्या. तसेच त्यात हिरवी चटणी, चिंचेची चटणी, १/२ चमचा तिखट, १/२ चमचा जिरेपूड, १ १/२ चमचा चाट मसाला, बारीक चिरलेला कोथिंबीर आणि १/२ लिंबू पिळा. हे मिश्रण चांगले मिसळा. त्यात भाजलेले पोहे आणि बारीक शेव घालून मिश्रण चांगले एकजीव करा. त्यावर थोडे चिरलेले कांदे टाका आणि पोहे चाट चा आस्वाद घ्या.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

SCROLL FOR NEXT