मिल्कमेडचा वापर करुन पदार्थाची मधुरता वाढवा!

घरच्या घरी जर आपल्याला काही झटपट बनवायचे असल्यास आपण मिल्कमेडची मदत घेऊ शकतो.
How to make milkmaid recipe in Marathi, milkmaid recipe ingredients
How to make milkmaid recipe in Marathi, milkmaid recipe ingredientsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय असते. विशेषत: रात्री जेवल्यानंतर अनेकजण मिठाई खाण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यातील काही जण गोड पदार्थामुळे वजन वाढते यासाठी ते खाणे सतत टाळतात. (How to make milkmaid recipe in Marathi)

हे देखील पहा -

घरच्या घरी काही पदार्थ (Food) बनवणे व ते खाणे ही वेगळी बाब आहे. परंतु, घरच्या घरी जर आपल्याला काही झटपट बनवायचे असल्यास आपण मिल्कमेडची मदत घेऊ शकतो. मिल्कमेडपासून आपल्याला काही स्वादिष्ट रेसिपी बनवता येतील. मिल्कमेडमधे साखर (Sugar) असल्यामुळे आपण कोणत्याही पदार्थात याचा वापर करताना आपण साखरेचा वापर टाळावा. आपल्या घरातील काही खास क्षणांसाठी देखील आपण मिल्कमेडचा वापर करुन पाककृती बनवू शकतो. जाणून घेऊया ती बनवायची कशी

How to make milkmaid recipe in Marathi, milkmaid recipe ingredients
नक्की ट्राय करुन पहा आंब्यापासून ही टेस्टी रेसिपी

मिल्कमेड- सुक्या खोबऱ्याचे लाडू

साहित्य - (milkmaid recipe ingredients)

मिल्कमेड - ३५० ग्रॅम

दुध (Milk) - १ कप

बदाम - २ छोटे चमचे

पिस्ता - २ छोटे चमचे

किसलेले सुके खोबरे - १ कप

वेलची पावडर - १/२ छोटे चमचा

तूप - २ छोटे चमचा

कृती -

१. सर्व प्रथम कढईत तूप घेऊन गरम करा.

२. तूप गरम झाल्यानंतर त्यात दुध टाका व सतत ढवळत राहा.

३. साधारण ५ मिनिटांनंतर अर्धी वाटी किसलेले खोबरे घालून चांगले एकजीव करा.

४.त्यात वेलची पूड घालून चांगले मिक्स करून गॅस बंद करा.

५. गॅस बंद केल्यानंतर मिश्रणाला लाडूचा आकार द्या व त्यांना किसलेल्या खोबऱ्यात वळवून घ्या.

६. यानंतर बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून लाडूवर सजवा आणि सर्व्ह करा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com