Apple Dishes Saam TV
लाईफस्टाईल

Apple Dishes : संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत सफरचंदपासून बनवलेल्या 'या' रेसिपी; घरच्याघरी एकदा ट्राय करा

Apple Dishes Recipe : संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या सफरचंदापासून बनवल्या जाणाऱ्या स्विट डिश. या डिश कशा बनवल्या जातात? त्याची रेसिपी काय आहे याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

सफरचंद हे असं फळ आहे जे सर्वच फळांमध्ये सर्वात पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे. दररोज एक सफरचंदाचे सेवन केले तर त्या व्यक्तीला रुग्णालयात जाण्याची गरज पडत नाही. तो व्यक्ती कायम निरोगी राहतो असं म्हटलं जातं. अशात संपूर्ण जगभरात सफरचंद फळापासून विविध रेसिपी बनवल्या जातात. त्यामुळे आज सफरचंदापासून तयार होणाऱ्या विविध रेसिपी बद्दल जाणून घेणार आहोत.

अ‍ॅप्पल पाई

अ‍ॅप्पल पाई अमेरिकन रेसिपी आहे. पेस्टी बनवून त्यात सफरचंदाची फिलिंग भरली जाते. त्यात दालचीनी, जायफळ आणि साखर यांचा समावेश असतो. ही एक स्विट डिश आहे. या डिश आयस्क्रिमसोबत खाल्ली जाते.

अ‍ॅप्पल स्ट्रूडेल

अ‍ॅप्पल स्ट्रूडेल ही एक ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध डिश आहे. यात पेस्टी रोल बनवून त्यात सफरचंदाची फिलिंग भरली जाते. ही देखील एक स्विट डिश आहे.

अ‍ॅप्पल टारटे टॅटिन

अ‍ॅप्पल टारटे टॅटिन ही फ्रांसमधील खास डिश आहे. जेवणानंतर डेझर्टमध्ये हमखास ही डिश चाखली जाते. यामध्ये सफचंद कॅरमलाज केलं जातं. तसेच पेस्ट्री पिठापासून बनवून ती गरमागरम बेक करून सर्व केली जाते.

अ‍ॅप्पल क्रिस्प

अॅप्पल क्रिस्प बनवताना त्याचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर यावर ओट्स, दही आणि ब्राउन शुगरच्या लेअर बनवल्या जातात. अशा पद्धतीने लेअर करत हे सर्व बेक केलं जातं. बेक झालेले अॅप्पल क्रिस्प चवीला फार छान लागतात.

अ‍ॅप्पल सॉस

अ‍ॅप्पल सॉस जर्मनीची प्रसिद्ध रेसिपी आहे. अ‍ॅप्पल सॉस बनवताना सफरचंद एका टोपात मैदा आणि दूध मिक्स करून गरम केले जाते. त्यात सफरचंदाचे काप टाकले जातात. त्यानंतर यावर मिरी पुड आणि चिली फ्लेक्स टाकून सर्व केलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

Satin Silk Saree: महिलांसाठी सॅटिन सिल्क साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न नक्की ट्राय क

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

SCROLL FOR NEXT