Skin care tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळ्यात त्वचेची काळजी अशा पध्दतीने घ्या

वर्षाच्या बाराही महिन्यात आपण त्वचेच्या संबंधीत अनेक समस्या पाहात असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असला तरी यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वर्षाच्या बाराही महिन्यात आपण त्वचेच्या संबंधीत अनेक समस्या पाहात असतो.

हे देखील पहा -

पावसामुळे हवेत अनेक प्रकारचे जंतू असतात ज्यामुळे आपल्या त्वचेला समस्या निर्माण होऊ शकतात. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण आपल्या त्वचेची जेवढी काळजी घेतो तेवढीच काळजी पावसाळ्यातही घेणं गरजेचे आहे. पावसाळ्यात वाढलेल्या आर्द्रतेमुळे फुटणे, पुरळ आणि तेलकटपणा निर्माण होतो. पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचाही धोका असतो. अशा परिस्थितीत आपण त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेची काळजी कशी घ्याची हे पाहूया.

१. पावसाळ्यात (Monsoon) साबणाचा वापर अवश्य करा. पावसाळ्यात आपल्या त्वचेला सतत तेल सुटत असेल तर साबण तेल (Oil) काढून टाकण्यास मदत करते. तसेच पावसाळ्यात सतत तोंड धुणे टाळा.

२. पावसाळ्यात अनेक जीवजंतू हवेत पसरलेले असतात त्याचे संक्रमण टाळण्यासाठी नैसर्गिक स्क्रबने चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातील. तसेच चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढवण्यासही मदत होईल.

३. पावसाळ्यात सनस्क्रीनचा वापर करा. पावसाळ्यात सूर्याची किरणे जरी आपल्याला दिसत नसली तरी ती आपल्या त्वचेला नुकसान पोहचवण्याचे काम करत असतात. त्यामुळे सनस्क्रीन लावयला हवी.

४. क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आपण आपली त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणे, टोन करणे आणि मॉइश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे. त्वचेची पातळी संतुलित करण्यात आणि आपली त्वचा निरोगी ठेवण्यास देखील मदत करेल.

५. पावसाळ्यात आर्द्रतेमुळे ओठही कोरडे होतात. त्यामुळे रात्री ओठांवर व्हॅसलीन लावून झोपा आणि आठवड्यातून दोनदा लिप मास्क लावा, यामुळे तुमच्या ओठांना आवश्यक पोषण मिळेल आणि ओठ मॉइश्चराइज राहतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT