Cracked Heels Saam Tv
लाईफस्टाईल

Cracked Heels : हिवाळ्याआधीच पायांच्या टाचांची काळजी घ्या, पाहा या घरगुती सोप्या टिप्स

Tips For Cracked Heels : हिवाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. सहसा हिवाळाच्या सुरवातीपासूनच आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे.

Shraddha Thik

Home Remedies For Cracked Heels :

हिवाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. सहसा हिवाळाच्या सुरवातीपासूनच आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. या ऋतूमध्ये ओठांसोबत आपल्या पायांनासुद्धा भेगा पडतात. जरी हिवाळ्यात टाचांना भेगा पडण्याची समस्या (Problem) सामान्य आहे, परंतु उपचार न केल्यास ते वेदनादायक असतात. भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकता.

टाचांना भेगा पडल्यामुळे कधी कधी शूज घालताना अस्वस्थ वाटते, त्वचा (Skin) सोलून निघते किंवा कधी सॉक्समध्ये अडकण्याची भीती असते. जेव्हा टाचांच्या सभोवतालची त्वचा जाड आणि कोरडी होते, तेव्हा टाच फुटू लागतात. हिवाळ्यात हा त्रास आणखी वाढतो. याला सामोरे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे टाचांना ओलावा ठेवणे. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

  • रात्री झोपण्यापूर्वी, कोमट पाण्यात वीस मिनिटे पाय (Legs) भिजवून ठेवा, नंतर प्युमिस स्टोन किंवा ब्रशने स्वच्छ करा. यानंतर, स्वच्छ पाण्याने धुवा आणि टॉवेलने वाळवा, नंतर मॉइश्चरायझर लावा, आरामदायक मोजे घाला आणि झोपी जा. सकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या टाचांमध्ये फरक जाणवेल. असे नियमित केल्याने काही दिवसातच तुमच्या टाच मऊ आणि सुंदर होतील.

  • कोरफड आणि ग्लिसरीन वापरा. एलोवेरा जेल एका भांड्यात घ्या आणि त्यात एक चमचा ग्लिसरीन घाला, मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. कोमट पाण्यात पाय स्वच्छ करा आणि ही पेस्ट भेगा पडलेल्या टाचांवर लावा. यामुळे टाचांमध्ये ओलावा टिकून राहील आणि त्यांना तडे जाणार नाहीत.

  • झोपताना फक्त सुती मोजे घाला. असे केल्याने हे पायांच्या त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइस्चराइज करण्यास अनुमती देते.

  • दररोज आंघोळ केल्यानंतर, टॉवेलच्या मदतीने आपल्या टाच कोरड्या करा आणि नंतर मॉइस्चराइजर लावा.

  • भरपूर पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचेची आर्द्रता टिकून राहते.

  • खोबरेल तेल आणि पेट्रोलियम जेली देखील लावता येते. हे चांगले मॉइश्चरायझिंग एजंट आहेत. हे क्रॅक झालेल्या टाचांना त्वरीत बरे करते.

  • आजकाल, पायाच्या सालीचे मास्क (फुट पील मास्क) देखील उपलब्ध आहेत जे भेगा पडलेल्या टाचांवर लावले जातात आणि काही काळ सोडले जातात. हे टाचांची मृत त्वचा सोबतच काढून टाकतात.

  • भेगा पडलेल्या टाचांवर लिक्विड बँडेज लावली जाते, जी स्प्रेसारखी असते. ते भेगांवर एक सील तयार करतात आणि बॅक्टेरिया आणि घाणीपासून संरक्षण करतात, ज्यामुळे वेदना देखील कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: मालाडमधील छटपूजेच्या आयोजनावरून मनसेचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

SCROLL FOR NEXT