Yoga Benefits
Yoga Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga Benefits : ताडासन आणि मार्जरी आसन वृद्धांसाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Benefits Of Yogasana : लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. योगा करताना वृद्ध व्यक्तींनी स्वतःला झेपेल अशाप्रमाणे योगा करावा.

अशातच योगाभ्यासानुसार सर्वप्रथम प्राणायाम करणे गरजेचे असते. मसलन, डीप ब्रीदिंग अशा प्रकारचे योग (Yoga) केल्याने शरीराला अनेक फायदे (Benefits) होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात वृद्ध व्यक्तींनी कशा पद्धतीने योगा करावा.

अशा पद्धतीने करा योगाची सुरुवात -

सर्वात आधी तुम्ही तुमच्या मॅट वरती पद्मासन करून घ्या. अर्ध पद्मासन किंवा सुखासन कोणत्याही आसनमध्ये बसून घ्या. आता दोन्ही हातांना इंटरलॉक करून डोक्याच्या वरती घेऊन जा आणि संपूर्ण शरीर वरच्या बाजूस स्ट्रेच करा. आता दहापर्यंत मोजून याच मुद्रामध्ये राहा आणि हात खाली घेऊन रिलॅक्स. आता दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम या शब्दाचे उच्चारण करा.

Tadasana

ताडासन -

हा योगा करताना तुम्हाला मॅट वरती उभे राहायचे आहे. हातांच्या बोटांना इंटरलॉक करा आणि शरीराचा बॅलन्स बनवत हात वरती उचला. तुमचं शरीर वरच्या दिशेला खेचून स्ट्रेच करा. आता काही वेळ याच मुद्रेमध्ये राहा आणि वीस पर्यंत आकडे मोजा. त्यानंतर हळूहळू हात खालच्या दिशेला आणा.

Marjariasana

मार्जरी आसन -

पाठ दुखी साठी माजरी असं करणे अत्यंत गरजेचे असते. हे आसन करण्यासाठी सर्वात आधी वज्रासन मुद्रेमध्ये बसून घ्या. हातांना गुडघ्यावरती ठेवून खालच्या बाजूस वाका. आता एका हाताची दूरी बनवून तुमचे शरीर वरच्या बाजूस उचला.

आता हात पाय न हलवता श्वास घ्या आणि कमरेला खालच्या बाजूस स्ट्रेच करून डोके उचला. आता श्वास सोडताना कमरेला उचला आणि डोके खाली करा. हे असं केल्याने तुम्हाला पाठ दुखी कंबर दुखी या समस्यांपासून सुटकारा मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : अहमदनगरमध्ये सुजय विखेंची ताकद वाढणार, महायुतीने आखला मास्टर प्लान!

Summer Season Tips: उन्हाळ्यात पाळीव प्राण्याची कशी घ्याल काळजी ?

Fraud Case : साखरेचे भाव वाढणार असल्याचे सांगत व्यापाऱ्यालाच गंडविले; ४० लाखात केली फसवणूक

Summer Detox Drinks: कडकत्या उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवेल 'ही' स्पेशल ड्रिंक

Devendra Fadnavis Meet Ganesh Naik : ठाण्यातलं नाराजीनाट्य फडणवीसांच्या भेटीने संपणार? गणेश नाईक-फडणवीस भेट होणार

SCROLL FOR NEXT