stomach pain causes google
लाईफस्टाईल

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

simple symptoms serious cancer: अनेकदा शरीरात दिसणारी काही लक्षणं साधी वाटतात परंतु त्यामागे गंभीर आजार लपलेला असू शकतो. डॉक्टरांच्या मते, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर होण्यापूर्वीच शरीर नेहमी लक्षणं दाखवेलच असं नाही. अनेकदा कॅन्सरचा ट्यूमर शरीरात शांतपणे तयार होत असतो. काहीवेळी कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. यामध्ये सततचा थकवा, रात्रीच्या वेळेस घाम येणं, शरीरावर डाग दिसणं किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल होतं. मुळात ही लक्षणं तर सौम्य आजारांमध्येही दिसून येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संकेतांमकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे.

ऑन्कोलॉजिस्ट्सच्या मते, शरीरामध्ये दिसून येणाऱ्या अशा लक्षणांमुळे ल्युकेमिया, लिम्फोमा, कोलन, ब्लॅडर, प्रोस्टेट, पॅनक्रियाज किंवा हाडांचा कॅन्सर यांचा धोका असू शकतो. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी तपासणी केली तर कॅन्सरचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात होण्यास मदत होते. परिणामी त्यावर उपचारही वेळेत होतात.

बिझनेस टुडेला माहिती देताना डॉ. मनदीप सिंग मल्होत्रा यांनी सांगितलं की, शरीर देत असलेल्या अगदी छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. योग्य वेळी तपासणी करून घेतल्यास जीव वाचवता येतो. त्यामुळे शरीर काय सांगतं ते ऐका, दुर्लक्ष करू नका.

कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

सततचा थकवा

थकवा हा केवळ कामामुळे किंवा झोपेच्या कमतरतेमुळे येत नाही. रक्तातील असामान्य पेशींच्या वाढीमुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला थकल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे सततचा थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

रात्री घाम येणं

झोपेत अचानक घाम येणं हे हार्मोन्सच्या असंतुलनाचं एक लक्षण मानलं जातं. मात्र लिम्फोमा सारख्या ब्लड कॅन्सरमध्येही हे लक्षण पाहायला मिळतं. जर दररोज रात्री तुम्हाला घाम येत असेल तर डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे.

शरीरावर डाग दिसून येणं

शरीरावर एखादा डाग पडला तर आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. मात्र हे रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याचे संकेत असतात. ल्युकेमियामध्ये रक्ताच्या पेशी योग्य पद्धतीने काम करत नाहीत, त्यामुळे लहान जखमेतूनही रक्तस्त्राव होतो. अशावेळी तुमच्या हातावर निळसर किंवा काळा डाग दिसून येतो.

शौचाच्या सवयींमध्ये बदल होणं

वारंवार लघवी लागणं, लघवी करताना वेदना होणं हे ब्लॅडर किंवा प्रोस्टेट कॅन्सरचं लक्षण असतं. शौचाच्या सवयींमध्ये बदल होणं जसं की, वारंवार जुलाब, बद्धकोष्ठता, शौचामध्ये रक्त दिसणं ही कोलोन कॅन्सरचं लक्षणं असू शकतात.

दीर्घकाळ टिकणारा खोकला

साधा खोकला काही दिवसांत बरा होतो. मात्र जर बरेच आठवडे तुमचा खोकला जात नसेल तर तो फुफ्फुस किंवा घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतो. खोकल्यातून रक्तस्राव होत असेल तर हा गंभीर संकेत मानला जातो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT