Swasthyam 2022 : आपल्या दैनंदिन आहारात असलेल्या अन्नपदार्थांचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतानाच योग्य सकस व पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करणे गरजेचे असते. आपल्या रोजच्या आहारात सकस व पौष्टिक अन्नाचा समावेश असेल तर, आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित व उत्तम राखण्यास मदत होते. सकस व पौष्टिक अन्नपदार्थ आपल्याला निरोगीही ठेवतात आणि अनेक आजारांपासून आपले संरक्षणही करतात.
अन्नाशी माणसाचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते तेव्हा आपले शरीर आपल्याला भूक लागली आहे अशी सूचना करतं. अनेकदा आपण भूक नसतानाही खातो आणि अनेकदा तीव्र भूक असतानाही खात नाही. आपला आहार केवळ भूक भागवण्यासाठी नसून, शरीराचे पोषण करण्यासाठी असतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीराला अनेक जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. शरीराच्या वाढीसाठी, स्नायूंच्या बळकटीसाठी, निरोगी स्वास्थ्यासाठी आहार सकस व परिपूर्ण असणे आवश्यक आहे.
प्रत्येक मनुष्याची खाण्याची इच्छा नेहमी एकसारखी नसते. खाण्याची इच्छा व भुकेची तीव्रता वयोमानानुसार बदलत जाते. याशिवाय आपण ज्या प्रदेशात राहतो तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार तेथे विशिष्ट प्रकारची पीकरचना असते, त्यामुळे आपण ज्या प्रदेशात राहतो तिथे पिकणारे प्राधान्याने खाणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने सकाळी भरपूर नाश्ता केला पाहिजे. त्यामुळे दिवसभर मानसिक आणि शारीरिक मेहनतीसाठी ऊर्जा मिळते. सकाळी केलेल्या नाश्त्यामुळे अन्य काही खाण्या-पिण्यावरही नियंत्रण राहते.
सकाळच्या नाश्त्यामध्ये तंतुमय आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे हे फायद्याचे असते. आजकालच्या आधुनिक बदलत्या जीवनशैलीमुळे, बैठे काम, अनियमित खाण्याच्या सवयी, फास्ट फूड्सचे अधिक प्रमाणात सेवन आणि व्यसनाधीनता यामुळे अनियंत्रित वजनवाढ व स्थूलपणा हा एक आजार झालेला आहे. भूक लागल्यावरच खाणे, प्रत्येक घास सावकाश व बारीक चावून-चावून खाणे, जेवताना मनातील इतर विचार व ताणतणाव बाजूला ठेवणे, टीव्ही, मोबाईल न पहाणे अशा काही साध्या गोष्टींचे पालन केले, तरी वजन आटोक्यात राहाण्यास मोठी मदत होऊन, मानसिक व शारीरिक आरोग्यही सुदृढ राहते. (Health News)
... म्हणून 'स्वास्थ्यम्'मध्ये सहभागी व्हा!
आधुनिक व स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताणतणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते. त्यातून नैराश्याच्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रयत्न करूनही ताणतणाव दूर होत नाही. अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर व सुदृढ आरोग्यदायी राखण्यासाठी ध्यानधारणा, प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहे. तसेच, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन गरजेचे आहे. नागरिकांची ही गरज ओळखून, ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत विश्व कल्याणाच्या उद्देशाने ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. संपूर्ण आरोग्याच्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमासाठी नागरिकांची उत्स्फूर्त नोंदणी झाली आहे.(Swasthyam 2022)
उद्घाटन कधी आणि कुठे?
‘स्वास्थ्यम्’ उपक्रमांतर्गत नागरिकांना तंदुरुस्ती, योग, प्राणायाम, अध्यात्म आदींबाबतचे सखोल मार्गदर्शन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून मिळणार आहे. ‘स्वास्थ्यम्’चे उद्घाटन प्रेम, नातेसंबंध, समाजकारण, राजकारणाच्या सद्य - स्थितीवर कवितांच्या माध्यमातून नेमके बोट ठेवणारे आणि युवकांमध्ये लोकप्रिय असलेले प्रख्यात कवी आणि खुमासदार वक्ते म्हणून देशभर ओळख असलेल्या डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. येत्या शुक्रवारी (ता. ९) होणार आहे.
3 दिवस मार्गदर्शन, विषय आणि तज्ज्ञ व्यक्ती
ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास : दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी रामायण आणि महाभारतातील शिकवण - (शुक्रवार ९ डिसेंबर - सांयकाळी ६.०० वाजता, गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.)
डॉ. राजेंद्र बर्वे : आजची नवीन सामान्य स्थिती आणि मन - (शुक्रवार ९ डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)
अभिनेत्री शिल्पा शेट्टी : कीप इट सिम्पल - योगा आणि फिटनेस - (शनिवार १० डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)
सूफी गायिका रुहानी सिस्टर्स - सुफियाना, - मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत आणि गायन - सायंकाळी ६.३० (गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे.)
उस्ताद राशीद खान - रात्री ८.३०
सर्वेश शशी : योगा, फिटनेस आणि त्यापलीकडे - (शनिवार १० डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)
अॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्सद्वारे शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वास्थ्य - (शनिवार १० डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)
प्रियांका पटेल : इमर्सिव्ह साउंड्स : साउंड हीलिंग कार्यशाळा - (शनिवार १० डिसेंबर - कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी)
डॉ. हंसाजी योगेंद्र : योगा : अ होलिस्टिक अॅप्रोच फॉर हेल्थ अँड वेलबिइंग - (रविवार ११ डिसेंबर - सकाळी १०.३० वाजता, पंडित फार्म्स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे)
अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : आनंदी जीवनाची कला - (रविवार ११ डिसेंबर - सकाळी ११.३० वाजता, पंडित फार्म्स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे.)
नूपुर पाटील : लर्न द रिअल मिनिंग ऑफ द वर्ड डाएट - (रविवार ११ डिसेंबर - दुपारी ३.३० वाजता, पंडित फार्म्स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे)
योगगुरू श्री एम : योग, अनंत क्षमतेचा मार्ग - (रविवार ११ डिसेंबर - सायंकाळी ६.०० वाजता, पंडित फार्म्स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे)
अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख : लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन तसेच त्यांच्या उपस्थितीत आगामी ‘वेड’ या चित्रपटाचे प्रमोशन - (रविवार ११ डिसेंबर : दुपारी २.०० वाजता, पंडित फार्म्स, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे)
प्रवेशिका या ठिकाणी उपलब्ध?
काही कार्यक्रम निमंत्रितांसाठी राखीव. प्रत्येक कार्यक्रमासाठी
स्वतंत्र प्रवेशिका आहेत. मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध.
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत
१. पंडित फार्मस् : गेट नं. २, डी. पी. रोड , कर्वेनगर, पुणे. SIILC : सकाळनगर, बेसमेंट बाणेर रोड , पुणे.
२. सीझन्स मॉल : बाटा शोरूम समोरील प्रवेशद्वार, हडपसर, पुणे. सकाळ हेड ऑफिस : ग्राउंड फ्लोअर, बुधवार पेठ, पुणे.
३. सकाळ पिंपरी ऑफिस : बी-झोन बिल्डिंग पाचवा मजला , एम्पायर इस्टेट शेजारी, पिंपरी
असे व्हा सहभागी...
मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.
https://www.globalswasthyam.com/
उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !
Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam
Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/
Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam
LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.